महाराष्ट्र
पाथर्डी- युवकाचा खून करून पळालेले 10 जण 12 तासात पकडले; पोलिसांचा थरारक पाठलाग
By Admin
पाथर्डी- युवकाचा खून करून पळालेले 10 जण 12 तासात पकडले; पोलिसांचा थरारक पाठलाग
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील देवराई येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी निवडणुकीमध्ये दोन गटामध्ये झालेल्या तुंबळ मारहाणीत एकाचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.या संदर्भात पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा करण्यात आला आहे. यात 10 आरोपींना 12 तासांचे 8 पकडण्यात यश आले, असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे.या संदर्भात सुनिल एकनाथ पालवे , संतोष रामदास पालवे, अंबादास सदाशिव पालवे, संजय विष्णु कारखेले, आकाश संजय पालवे, सविता अनिल पालवे, अनिल एकनाथ पालवे, दिनकरराव सावळेराम पालवे, दिनकरराव सावळेराम पालवे यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. बाळासाहेब नवनाथ पालवे (रा. देवराई) यांनी तक्रार दिली आहे.
शनिवारी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास विजयी पॅनल बालाजी शेतकरी विकास मंडळ पॅनलतर्फे साउंड सिस्टम लावून मिरवणूक चालू होती. त्यावेळी 15 ते 20 लोकांनी देवराई विविध कार्यकारी सहकारी सोसायटी निवडणुकांमध्ये पराभूत झाल्याच्या कारणावरून पूर्वतयारीने त्यांच्यावर अचानकपणे तलवार, सुरा, लोखंडी कुऱ्हाड, लाकडी दांडके हल्ला करण्यात आला होता. सदर हल्यात अजय गोरक्ष पालवे याचा खून झाला. इतर तीन लोक गंभीर जखमी झाले.
सोसायटीच्या लागलेल्या निकालानंतर दोन गटांमध्ये मोठा वाद निर्माण होऊन एकमेकांवर हल्ला करण्याची घटना घडली होती. यामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आणि त्यातील एका जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या संदर्भामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी तात्काळ गुन्हेगारांचा शोध लावा, असे आदेश दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे तीन पथक वेगवेगळ्या ठिकाणी पाठविण्यात आलेले होते. आरोपी मिरीमार्गे गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे एक पथक या ठिकाणी रवाना झाले होते.
घटनेनंतर देवराई परिसरात मोठ्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच तेथील ग्रामस्थांनी नगर ते तिसगांव जाणारे नैशनल हायवे 61 वर येऊन दोन ते तीन तासासाठी रस्ता रोको केला होता. दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना समजल्यानंतर पोलीसांनी परस्थिती कौशल्याने हाताळून रस्ता पुन्हा सुरळीत केला. तसेच आरोपीची माहीती काढून अतिशय थरारक गणे त्यांचा पाठलाग केला. पोलिसांनी पाथर्डी पोलीस ठाणे यांनी गुन्ह्यातील दोन सुनिल एकनाथ पालवे, संतोष रामदास पालवे, अंबादास सदाशिव पालवे यांना शिताफीने पकडले. तसेच गुन्ह्यातील इतर आरोपी हे त्यांचे ताब्यातील फॉर्चूनर गाडी नं. एम. एच. 16 बी.झेड. 3131 याने भरधाव वेगाने तिसगाव येथून मिरी माका, देवगाव, कुकाणा नेवासा या मार्गाने पळून जात असताना उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्या पथकाने आरोपीनाबेड्या ठोकल्या.
पोलिसांनी नेवासा फाटा येथे नाकाबंदीदरम्यान आरोपींना ताब्यात घेतले. सदर फॉर्च्यूनर गाडीमधून पोलिसांनी संजय विष्णु कारखेले, आकाश संजय पालवे, सविता अनिल पालवे, अनिल एकनाथ पालने, दिनकरराव सावळेराम पालवे यांना ताब्यात घेतले. तसेच स्थानीक गुन्हे शाखा नगर यांचे पथकाने अक्षय संभाजी पालवे याला ताब्यात घेतले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे, यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कटके व त्यांचे पथक यांनी यशस्वी करून बारा तासांच्या आत खुनातील आरोपींना ताब्यात घेतले. सपोनि. कायंदे, पोलीस कर्मचारी भगवान सानप, अनिल बडे, नवगीरे, पोहेकॉ. दळवी, पोहेकॉ चव्हाण, कराड, किशोर पालवे, तसेच नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक करे, पोलीस कर्मचारी यादव, लोडमल, गुंजाळ, पोकॉ/म्हस्के यांच्या पथकाने कारवाई केली.
Tags :
425803
10