भरधाव कारने चिमुकल्यास चिरडले; आई-वडिलांच्या कुशीत सोडले मुलाने प्राण
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पैठण-बारामती रोडवरील कडा येथे एका भरधाव कारने ५ वर्षीय बालकाला चिरडल्याची घटना रविवारी रात्री ९
३० वाजेच्या सुमारास घडली. रूद्रा संतोष मोटे असे मृत बालकाचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील कडा येथील संतोष मोटे हे पत्नी, व दोन मुलांना घेऊन रविवारी रात्री घराकडे जात होते. काही कामानिमित्त ते रस्त्याच्या कडेला थांबले. यावेळी अचानक धामणगावकडून कड्याकडे येत असलेल्या भरधाव कारने ( एमएच २४,ए.डब्लु .६५९९ ) रस्त्याच्या कडेला खेळत असलेल्या रूद्रला जोरदार धडक दिली. यात रुद्र गंभीर जखमी झाला. अहमदनगर येथे उपचारासाठी घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाला.
माहिती मिळताच कडा पोलिस चौकीचे पोलिस हवालदार बाबासाहेब गर्जे, अंमलदार सचिन गायकवाड, मंगेश मिसाळ, दिपक भोजे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.