शैक्षणिक
कवडदरा विद्यालयातील पांडुरंग निसरड यांचा सेवापुर्ती सोहळा व सत्कार समारंभ
By Admin
कवडदरा विद्यालयातील पांडुरंग निसरड यांचा सेवापुर्ती सोहळा व सत्कार समारंभ
कवडदरा - प्रतिनिधी
अमोल म्हस्के
इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील भारत सर्व सेवा संघ संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर काॕलेजमधील शिक्षकेतर सेवक कर्मचारी संस्थेमध्ये ३६ वर्षाच्या प्रदिर्घ सेवा करत
श्री.पांडुरंग बारकु निसरड शुक्रवार दि.३० सप्टेंबर २०२२ रोजी सेवानिवृत्त होत असून त्याच्या सेवापूर्ती सोहळा व सत्कार समारंभ कार्यक्रम शुक्रवारी(दि.३०) सकाळी ११.०० वाजता कवडदरा येथील साई पालखी निवारा हाॕल,मेहता रोड येथे होणार आहे.
पांडुरंग निसरड यांनी भारत सर्व सेवा संघ संस्थेमध्ये टाकेद गावातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर काॕलेजमध्ये दि. ०१/०८/१९८६ रोजी सेवेला सुरूवात झाली.यावेळी त्यांनी शिक्षकेतर कर्मचारी शिपाई पदावर त्यांची नेमणूक झाली. या विद्यालयात सहा वर्षे सेवा केली.
त्यांना विद्यालयातील माजी प्राचार्य नायकुडी सर यांचे विशेष सहकार्य मिळाले.
त्यानंतर न्यू इंग्लिश स्कूल टाकेद विद्यालयातून त्यांची बदली दि. ०१/०८/१९९२ रोजी त्याच्या मुळगावी कवडदरा येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात झाली.
त्यांनी सेवेत असताना शालेय कामकाज जबाबदारीने व्यवस्थितपणे पार पाडले.त्यांच्या स्वभाव शांत व मनमिळावू होता.
त्यांची अशी कवडदरा विद्यालयात ३० वर्षे सेवा झाली असून
एकूण आजपर्यंत ३६ वर्षे सेवा त्यांनी भारत सर्व सेवा संघ संस्थेमध्ये केली केली आहे.
भारत सर्व सेवा संघाचे संस्थापक स्व.बी.के.पाटील सर यांचा सहवास लाभला.तसेच भारत सर्व सेवा संघ संस्थेचे माजी अध्यक्ष दौलतराव पवार,माजी सचिव गिरीधर तुवर तसेच आजी- माजी सर्व संस्था पदाधिकारी,अध्यक्ष,सचिव यांचे सहकार्य सेवा करत असताना मिळाले.
पांडुरंग निसरड (मामा) यांना दोन मुले व एक मुलगी आहे.त्यातील दोन मुलापैकी हनुमंता निसरड हे नाशिक जिल्हा भाजप उपाध्यक्ष पदी आहेत.
तसेच श्री. लहु निसरड शिक्षक आहेत.
श्री. पांडुरंग निसरड यांचा सेवापुर्ती सोहळा व सत्कार समारंभ विविध मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे.
Tags :
123420
10