महिलेचा विनयभंग, तरुणाविरूद्ध गुन्हा; मारहाणीची धमकी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेळ्या चाराण्यासाठी शेतात जाणार्या महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार तालुक्यातील माळेगावात घडला. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून सिध्दार्थ अर्जुन थोरात (रा.
दुलेचांदगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित महिला एकटीच त्यांच्या शेतात शेळ्या चाराण्यासाठी चालली होती. तेव्हा महिलेच्या ओळखीचा सिध्दार्थ अर्जुन थोरात (रा. दुलेचांदगाव) हा तिच्या जवळ आला. तो म्हणाला की, मला तुझ्याशी बोलायचे आहे. महिला शेळ्या घेऊन पुढे जाऊ लागली असता, थोरात याने महिलेस शिवीगाळ करुन लाकडी काठीने हातावर, पायावर मारहाण करुन दुखापत केली.
तिचा हात धरुन, तू मला फार आवडतेस, माझ्या सोबत बोलत का नाहीस, असे म्हणून हात ओढून महिलेस लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. महिलेने आरडा ओरडा केल्याने थोरात निघाला. परंतु, जाताना, तू माझ्याशी बोलली नाहीस व माझ्याशी संबंध ठेवले नाही, तर मी तुझ्या नवर्याला मारहाण करील, अशी धमकी दिल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक अनिल बडे पुढील तपास करीत आहेत.