पाथर्डी-शेवगाव तालुक्यातील 'या' ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कारवाई
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
विविध कारणांनी जिल्ह्यातील काही ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर विविध आरोपांखाली कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी हे आदेश दिले.
गायकवाड जळगाव (ता. शेवगाव) येथील तत्कालीन ग्रामविकास अधिकारी आर. बी. काळे, वडगाव तनपुरा (ता. कर्जत) येथील र. मु. शेलार, मिरी (ता. पाथर्डी) येथील ज्ञा. गो. सोनवणे या तत्कालीन ग्रामविकास अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली.
हळगाव (ता. जामखेड) येथील आ. दा. आखाडे यांच्यावर अनियमितता, लोणी खुर्द (ता. राहाता) येथील शि. दु. सुपे, बोधेगाव (ता. राहुरी) येथील आर. व्ही. बोर्डे, तसेच माळी चिंचोरे (ता. नेवासे) येथील ब. तु. शेटवाड यांच्यावर गैरवर्तनप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. खुरदैठण (ता. जामखेड) येथील ग्रामसेवक इमान शेख, दिघी (ता. नेवासे) येथील महादेव ढाकणे, काळेगाव (ता. शेवगाव) येथील श. यू. पठाण आदींविरोधात कारवाई करण्यात आली आहे.