महाराष्ट्र
पेट्रोलपंपावरील दहा लाखांची रोकड घेऊन पोबारा केलेला मॅनेजर अटकेत; दोन लाख हस्तगत
By Admin
पेट्रोलपंपावरील दहा लाखांची रोकड घेऊन पोबारा केलेला मॅनेजर अटकेत; दोन लाख हस्तगत
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शहरातील दीपक पेट्रोलपंपावरील मॅनेजरकडे बँकेमध्ये भरण्यासाठी दिलेली रोख रक्कम परस्पर घेऊन पसार झालेला सराईत आरोपी २ लाख रुपये रोख रकमेसह पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
ऑगस्टीन जॉर्ज गोन्सालविस (वय ३८ रा. ख्रिश्चन कॉलनी, तारकपूर, अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
अहमदनगर : शहरातील दीपक पेट्रोलपंपावरील मॅनेजरकडे बँकेमध्ये भरण्यासाठी दिलेली रोख रक्कम परस्पर घेऊन पसार झालेला सराईत आरोपी २ लाख रुपये रोख रकमेसह पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. ऑगस्टीन जॉर्ज गोन्सालविस (वय ३८ रा. ख्रिश्चन कॉलनी, तारकपूर, अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल व नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेतील सोपान गोरे, राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, बापूसाहेब फोलाणे, देवेंद्र शेलार, सखाराम मोटे, भीमराज खर्से, शंकर चौधरी, रवि सोनटक्के, दीपक शिंदे व उमाकांत गावडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
याबाबत माहिती अशी की, १९ एप्रिल २०२२ रोजी भारत पेट्रोलियम कंपनीचा दीपक पेट्रोलपंप (नगर मनमाड रोड, झोपडी कॅन्टीन जवळ, सावेडी अहमदनगर) येथे पेट्रोलपंप आहे. पंपावर ऑगस्टीन जॉर्ज गोन्सालविस (रा. ख्रिश्चन कॉलनी, तारकपूर, अहमदनगर) यास मॅनेजर म्हणून कामावर ठेवले होते. ऑगस्टीन यास पेट्रोल पंपावरील जमा झालेली रोख रक्कम ९ लाख ९७ हजार ३८४ व कामगारांचे पगाराचे रोख रक्कम ४० हजार रुपयांचा असा एकूण १० लाख ३७ हजार ३८४ रुपये रोख रकमेचा भरणा बँकेत करण्यासाठी दिली होती. परंतु, रक्कम बँकेत भरणा न करता स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता परस्पर घेऊन गेला होता.
या घटनेबाबत अनिल भोलानाथ जोशी (रा. मेघराज कॉलनी, सहकारनगर, सावेडी, अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात नोकराने केलेला विश्वासघात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले होते.
तपासाअंती आरोपी ऑगस्टीन गोन्सालविस हा अंबरनाथ (ता. कल्याण) येथे त्याच्या नातेवाईकांकडे सापडला. आरोपी ऑगस्टीन जॉर्ज गोन्सालविस हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुध्द अहमदनगर येथे सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, विनयभंग व फसवणूक असे एकूण ३ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
Tags :
15183
10