मुलीने भाऊ समजून पविञ नांत जपत बांधली राखी अन् बनली अत्याचाराची शिकार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
भावाबहिणीच्या पवित्र नात अधिक घट्ट करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. अनेक वेळा रक्ताच नात नसलं तरी रक्षाबंधनाने या नात्याची गाठ अधिक पक्की होत असते. राखी बांधणाऱ्या बहिणीच्या रक्षणाच वचन भाऊ तिला देत असतो.
याच पवित्र सणाच्या निमीत्ताने भाऊ बनण्याचा बहाणा करत नराधमाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघकीस आली आहे.
नराधमाने तिच्याकडून राखी बांधून घेतली
शहरातील अत्यंत गंभीर घटनेची अधिक माहिती अशी की शहर परिसरात राहणाऱ्या एका १७ वर्षीय बारावीत शिक्षण घेत असणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर सलमान शेख राहणार अहमदनगर याने रक्षाबंधन सणाचे निमित्त साधून भाऊ बनण्याचा बनाव रचून अल्पवयीन मुलीला फसवले. विद्यार्थिनीकडून राखी बांधून घेतली. त्यानंतर २६ ऑगस्ट रोजी दुपारी सदर पीडित तरुणी कॉलेजला जात असताना आरोपी सलमान शेख याने तिला रस्त्यात अडवून तिच्या सोबत जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. सोबत आली नाहीस तर जिवे मारण्याची धमकी देखील दिली. आरोपी सलमान शेख अल्पवयीन विद्यार्थिनीला अहमदनगर सिद्धिबाग परिसरात जबरदस्तीने नेऊन तिच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल, असे अश्लील कृत्य केले. यावेळी पीडित मुलीने आरडाओरड करून स्थानिक नागरिक जमवले. नागरिकांनी लगेचच पोलिसांना बोलवून घेतले. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही पोलीस स्टेशनमध्ये नेऊन पीडित मुलीला विचारपूस करून तिचा जबाब नोंदविला. तिच्या घरच्यांना बोलवून या विषयासंदर्भात अहमदनगर
कोतवाली पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल केले.
पालक वर्गात प्रचंड खळबळ
या घटनेने परिसरासह अहमदनगर शहरात पालक वर्गात प्रचंड खळबळ उडाली. याबाबत आरोपी सलमान शेख याला पोलिसांनी तातडीने अटक केली आहे. या आरोपीने इतर मुलींबाबत असे प्रकार केले आहे का? याचा अतिशय काटेकोरपणे शोध घेतला जात आहे.