पाथर्डी शहरात पोलीस प्रशासन व नगरपालिकेच्या वतीने विना मास्क फिरणा-यावर दंडात्मक कारवाईला सुरूवात
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी शहरात मा.जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पोलिस प्रशासन व नगरपालिकेच्या वतीने विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईला सुरूवात आज झाली असून मुख्य रस्त्यावर तसेच बाजारपेठेत कारवाईला सुरूवात करत व आज काही प्रमाणात समज देत नियमित पणे कारवाई होत. आहे तरी मा. तहसिलदार यांनी सांगितलेल्या नियमांचे नागरिकांनी व व्यापारी, व्यवसायीक यांनी पालन करावे व कारवाई टाळावी असे आवाहन न. पा.प्रशासकीय अधिकारी अय्युब सय्यद व सहाय्यक निरीक्षक दिलीप राठोड यांनी केले आहे. तसेच मंगल कार्यालय, हॉटेल्स व गर्दी होणारे ठिकाणांची ही तपासणी होणार असुन नियमांच उल्लंघन करणाऱ्या वर दंडात्मक कारवाई होणार आहे. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. नगरपालिकेच्या वतीने जनजागृती ही करण्यात येणार आहे.