Breaking-ओंकार भालसिंग खुनातील 'या' फरार आरोपीला अटक
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
ओंकार भालसिंग या तरुणाचा ता. 17 नोव्हेंबर 2020 रोजी दुचाकीवरून घरी जात असताना कुख्यात गुंड विश्वजित कासार व त्याच्या साथीदारांनी लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने मारहाण करून त्याचा खून केला होता. या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विश्वजित कासार व त्याच्या चार साथीदारांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे.
वाळकी (ता. नगर) येथील ओंकार भालसिंग खून प्रकरणातील फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गिरनारे (नाशिक) येथे सापळा लावून अटक केली. सचिन चंद्रकांत भांबरे (वय 38 रा.
बाबूरावनगर, घोडनदी, शिरूर, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो दोन वर्षापासून पसार होता. त्याच्यावर मोक्का कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे.
ओंकार भालसिंग या तरुणाचा ता. 17 नोव्हेंबर 2020 रोजी दुचाकीवरून घरी जात असताना कुख्यात गुंड विश्वजित कासार व त्याच्या साथीदारांनी लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने मारहाण करून त्याचा खून केला होता. या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विश्वजित कासार व त्याच्या चार साथीदारांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे.
कासार टोळीविरूध्द मोक्का कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे. आरोपी सचिन भांबरे हा पसार होता. पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक गणेश इंगळे, दिनकर मुंडे, पोलिस अंमलदार राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, बापूसाहेब फोलाणे, देवेंद्र शेलार, भीमराज खर्से, विशाल दळवी, रवी सोनटक्के, उमाकांत गावडे यांच्या पथकाने आरोपी भांबरे याच्या ठावठिकाणाविषयी माहिती घेऊन त्याला शिताफीने अटक केली.