साईदीपचे मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेत नेत्रदीपक यश
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील वायकर वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा इयत्ता पहिलीचा विद्यार्थी साईदीप जतिन चव्हाण हा मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत पाचवा आला आहे.
साईदीपच्या या नेत्रदीपक यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते, विस्ताराधिकारी अभयकुमार वाव्हळ, केंद्रप्रमुख राजेंद्र बागडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मच्छिंद्र दिवटे आणि सर्व पालकांनी साईदीपला शुभेच्छा देऊन त्याचे अभिनंदन केले.
तसेच तालुकास्तरीय व्हि टी एस ई स्पर्धा परीक्षेत साईदीप हा तालुक्यात पहिला तर सायली चव्हाण इयत्ता चौथी ही तिसरी आली.
दुर्गा घोडके इयत्ता दुसरी तालुक्यात सातवी, अंजली घायदार इयत्ता दुसरी, ओवी भडके इयत्ता चौथी या विद्यार्थ्यांनीनी या परीक्षेत उत्तुंग यश संपादन केले.
शाळेच्या वतीने यशस्वी झालेल्या इयत्ता पहिली ते चौथीचे, स्पर्धा परीक्षेत बसलेल्या सर्व बालकांना प्रेरणा म्हणून बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.
साईदिपला या परीक्षेसाठी त्याचे वडील जतिन चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले तर इतर सर्व विद्यार्थ्यांना पालक व सदरील शाळेच्या शिक्षिका ज्योती आधाट आणि शिक्षक पोपट फुंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.