तिसगाव येथे बनावट दारू विक्री करणा-यांवर कारवाईसाठी उपोषणाचा इशारा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव मध्ये चढ्या भावाने देशी व बनावट दारु विक्री केली जात असल्याची तक्रार अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक,जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे केली आहे.संबंधित दारु विक्रेत्याचा परवाना रद्द करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव शहरात देशी लायसन्स धारक हे किंमतीपेक्षा जास्त रक्कम घेऊन सर्वसामान्य जनतेचे आर्थिक लूट करत आहे.सदरच्या लायसनधारकाकडे बनावट दारू विक्री राजरोसपणे होत असल्याचा आरोप अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आला आहे.दारुच्या दुकानांमध्ये शासकीय कोट्यापेक्षा जास्त दारू साठा असून,खाजगी वाहनातून हॉटेल व्यवसयिकांना विक्री केली जात आहे.सर्वसामान्य ग्राहकां कडून अव्वाच्या सव्वा किंमत घेतली जात असून, विचारणा केली असता अरेरावीची भाषा ग्राहकांना वापरली जाते.यामुळे तिसगावच्या देशी लायसन धारकांनी अनेक तक्रारी केल्या आहेत.मात्र दारु व्यावसायिकाचे प्रशा सनाशी अर्थपूर्ण संबंध असल्याने त्यांच्यावर अद्याप पर्यंत कारवाई केली जात नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.या प्रकरणी तिसगावच्या देशी दारू विक्री करणार्या परवानाधारकांची चौकशी करुन दोषी असलेल्यांचा परवाना रद्द करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.एका महिन्यात कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्याल यासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.