शेवगाव- केदारेश्वर कारखाना करणार सहा लाख मॅट्रिक टन ऊस गाळप! केदारेश्वरच्या पहिल्या मिल रोलरचे पूजन संपन्न
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२२/२३ च्या गळीत हंगामाच्या पहिल्या मिल रोलरचे पूजन कारखान्याचे अध्यक्ष ऍड प्रतापराव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे शेतकी अधिकारी अभिमन्यू विखे व त्यांच्या सुविद्य पत्नी तसेच कारखान्याचे जेष्ठ संचालक सुरेशचंद्र होळकर, बापूराव घोडके, त्रिंबक चेमटे, कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आश्विनकुमार घोळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आहे. याप्रसंगी कारखान्याच्या पहिल्या मिल रोलरची विधीवत पूजा करून तो बसविण्यात आला असून चालू गळीत हंगामाची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आश्विनकुमार घोळवे यांनी दिली आहे. तसेच पुढे अधिक माहिती देताना ते म्हणाले की, चालू गळीत हंगामासाठी सहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून येत्या एक ऑक्टोबर २०२२ रोजी कारखाना सुरू करण्यासंदर्भात सर्व मशिनरी या सुरू करून येणाऱ्या हंगामाची जय्यत तयारी सुरू करण्यासाठी कारखाना प्रशासन हा पूर्णपणे सज्ज झालेला आहे. तसेच मागील गळीत हंगामात गळीत झालेले सर्व उसाचे पेमेंट हे एफ.आर.पी. प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झाले असून पेमेंट वर्ग झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण पसरले आहे. यावेळी कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे, प्रशासकीय अधिकारी पोपटराव केदार, चीफ इंजिनियर प्रवीण काळुसे, चीफ अकाउंटंट तीर्थराज घुंगरड, चीफ केमिस्ट पुंडलिक सांगळे, लीगल ऑफिसर शरद सोनवणे, केनियार्ड सुपरवायझर किसनराव पोपळे हेड पैन इन्चार्ज चंद्रकांत शिंदे, असिस्टंट इंजिनियर वडजकर साहेब, गडदे साहेब, रघुनाथ सानप, विठ्ठल बटुळे, कृष्णा कराड, महादेव खेडकर, अंबादास दहिफळे, सुधाकर खोले, पांडुरंग पालवे यांच्यासह परिसरातील शेतकरी, सभासद, ऊस उत्पादक, कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.