विवाहितेच्या आत्महत्येचा बनाव; सासरच्या लोकांवर अखेर खुनाचा गुन्हा दाखल
शेवगाव-गेवराई रस्ता अडवत मयत मुलीच्या नातेवाईकाचा रस्ता रोको
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
बीडच्या नरसिंह तांडा गावातील अंजली सुनील राठोड या विवाहितेचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. परंतु, सदर विवाहितेने आत्महत्या (Suicide) नव्हे तर तिचा खुन केल्याबाबतची तक्रारी माहेरच्या मंडळींनी ( Crime News) केली होती.
यावरून मृत महिलेच्या पतीसह सासरा, सासु, दिर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
बीडच्या (Beed) नरसिंह तांडा गावातील अंजली सुनील राठोड या विवाहितेचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्यावरून अंजली राठोड यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. मात्र सदरचा प्रकार हा आत्महत्या नसुन सासरच्या लोकांनी केलेला खुन आहे. असा आरोप मयत विवाहित मुलीच्या नातेवाईकांनी केला होता.
रास्ता रोकोनंतर गुन्हा दाखल
या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा; यासाठी मयत मुलीच्या नातेवाईकांनी गेवराई शेवगाव महामार्ग अडवत रस्ता रोको केला होता. या प्रकरणी आता मयत मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पती, सासू, सासरा, दिर यांच्यावर चकलंबा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.