जवाहर विद्यालयाचे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय यश
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर इजदे येथील जवाहर विद्यालयाने नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत १७ वर्षे वयोगटातील मुलींनी कबड्डी प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला.
जिल्हास्तरावर निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे व मार्गदर्शक क्रीडा शिक्षकांचा विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब खेडकर ,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधून नुकतीच मुख्याध्यापक बाळासाहेब खेडकर यांची तालुका मुख्याध्यापक संघाच्या खजिनदार पदी नियुक्ती झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी श्रीम. माळवे सुरेखा, सौ. बडे सविता, खुटाळे वैभवकुमार, फुंदे निलेशकुमार, उदमले विशाल, घायाळ धनंजय, खेडकर रविंद्र, डोळे सुभाष, जायभाये सुभाष, लोखंडे उद्धव, डमाळे भुजंग उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.धनश्री शिरसाट यांनी केले तर आभार वैभव कुमार खुटाळे मानले.