महाराष्ट्र
विविध सामाजिक उपक्रमांनी आतिश नि-हाळी यांचा वाढदिवस साजरा
By Admin
विविध सामाजिक उपक्रमांनी आतिश नि-हाळी यांचा वाढदिवस साजरा
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्याचे प्रथम आमदार स्व. माधवराव नि-हाळी यांचे नातू तथा सामाजिक कार्यकर्ते आतिष नि-हाळी यांचा वाढदिवस पाथर्डी शहरात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. आरोग्य शिबिर, स्पोर्ट्स ड्रेस वाटप, गरीब मुलांना शालेय साहित्य वाटप, अनाथ मतिमंद मुलांना ड्रेस वाटप, रक्तदान शिबिर इत्यादी उपक्रम राबविण्यात आले.
एम.एम.नि-हाळी विद्यालयातील १०० खेळाडूंना मोफत स्पोर्ट्स ड्रेसचे वाटप करण्यात आले. यानंतर जिल्हा परिषद मुलींच्या शाळेत मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
तसेच अनाथ मतिमंद विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स ड्रेस चे वाटप केले. पाथर्डी शहरातील नागरिकांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन केले होते.या मध्ये रक्तदान शिबिर ,मोफत नेत्र तपासणी शिबीर, मोफत मोतीबिंदू निदान शिबिर व बूस्टर डोस इत्यादी.
एम.एम.नि-हाळी विद्यालयातील खेळाडूंना स्पोर्ट्स ड्रेस वाटण्याचा कार्यक्रम एकलव्य शिक्षण संस्थेचे सचिव प्रताप ढाकणे यांच्या हस्ते करण्यात आला.
या वेळी ढाकणे म्हणाले, स्व.माधवराव नि-हाळी यांचा सेवावृत्तीचा वारसा आतिष हे त्याच भावनेने जोपासत आहेत. समाजाला देण्याची भावना ज्यांच्याजवळ आहे, तिच माणसे समाज्याचा उत्कर्ष करतात.येणाऱ्या काळात मी आतिषच्या पाठीशी खंबीर उभा राहील.
आरोग्य शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, युवा नेते सिद्देश ढाकणे, नगरसेवक बंडु बोरुडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ४८ नागरिकांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला.७८ नागरिकांनी नेत्र तपासणी शिबिरात सहभाग घेतला. तसेच १८२ नागरिकांनी बूस्टर डोस कॅम्प मध्ये सहभाग घेतला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सिताराम बोरुडे,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नासिर शेख,नगरसेवक चाँद मणियार, माजी नगराध्यक्षा रत्नमाला उदमले, आरती नि-हाळी,योगेश रासने,देवा पवार, हुमायून आतार ,वैभव शेवाळे,अभय गांधी,अक्रम आतार,रोहित पुंड,संतोष वराडे,सतिष बडदे,मुकुंद भालसिंग,राजू खोजे,महेश बडदे,संतोष कुलट,शंकर पंडित,संदेश बाहेती,ओम भालसिंग,विशाल नि-हाळी,अक्षय वराडे, आकाश भातोडे,प्रतीक वराडे व सर्व आतिष नि-हाळी मित्र मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
अष्टवाडा तरुण मंडळाच्या वतीने वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.यामध्ये मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतिबिंदू निदान शिबिराचे आयोजित केले होते. या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादीचे तालुक्याध्यक्ष शिवशंकर राजळे,युवा नेते सिद्देश ढाकणे यांच्या हस्ते झाले. या शिबिरासाठी पाथर्डीतील प्रसिद्ध व्हिजन प्लस सेंटर शिरसाठ ऑप्टिकल पाथर्डी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. कार्यक्रमासाठी सर्व अष्टवाडा तरुण मंडळाचे सदस्य उपस्थित होते .या शिबिरात ७२ नागरिकांनी सहभाग घेतला.
Tags :
209
10