अवैध दारू विक्री; जिल्हा पोलिस प्रमुखांकडे तक्रार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील त्रिभुवनवाडी येथे गेल्या काही दिवसांपासून अवैध दारू विक्री केली जात असून यामुळे ग्रामस्थांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो.
यासंदर्भात नागरिकांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. चौकात खुलेआम अवैध दारू विक्री बंद करावी व संबंधित व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
त्रिभुवनवाडी येथील ज्या चौकात अवैध दारू विक्री केली जात आहे. त्यापासून हाकेच्या अंतरावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. जवळच मंदिर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह भाविकांना व ग्रामस्थांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. स्थानिक पोलिसांकडे अधिकृत लेखी तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
म्हणून जिल्हा पोलिस पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. या ठिकाणी सुरू असलेल्या अवैध दारू विक्री बंद करावी, अशी प्रमुख्याने मागणी निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी केली. याकडे पाथर्डी पोलिसांनी लक्ष घालून ही अवैध दारू विक्री बंद करणार का हे आता महत्वाचे ठरणारे आहे.