महाराष्ट्र
शेवगाव- पोलीस उपअधीक्षक कार्यालयासमोर 'यां' कारणांमुळे केले ठिय्या आंदोलन
By Admin
शेवगाव- पोलीस उपअधीक्षक कार्यालयासमोर 'यां' कारणांमुळे केले ठिय्या आंदोलन
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेवगाव : वंचित बहुजन आघाडीकडून शेवगाव पोलीस उपअधीक्षक यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव पोलीस स्टेशनमधील काही पोलीस कर्मचार्यांच्या विरोधात ठिय्या हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी प्रा. चव्हाण म्हणाले की, शेवगाव पोलीस ठाण्यातील काही पोलीस कर्मचारी तक्रार घेऊन येणाऱ्या व्यक्तींना अरेरावी करतात. एनसी दाखल करण्यासाठी १० ते २० हजार रुपयांची मागणी करतात. पैसे दिले नाहीतर दिवसभर बसवून ठेवतात, असे गंभीर आरोप यावेळी चव्हाण यांनी आपल्या भाषणात केले.
बालमटाकळी येथील एका दलित कुंटुबातील तरूणाने पोलीस हवालदार यांच्या जाचाला कटांळून आत्महत्या केली. संबंधित पोलीस कर्मचारी भरचौकात सांगतात की, आमचे कोणीही काहीही करू शकत नाही, असे उघडपणेही बोलतात. असे गंभीर आरोप यावेळी करण्यात आले.
या ठिय्या आंदोलनात शेवगांव तालुकाध्यक्ष शेख प्यारेलाल, राजू नाईक, रविंद्र निळ, शेख सलीम जिलानी, लक्ष्मण मोरे, गणेश भिसे, गोरख वाघमारे, शेख राजूभाई, अनिल गंगावणे, महेश घायतडक, दिलीप वाघमारे, शेख चांदभाई, रविंद्र सर्जे, महादेव जगधने, लक्ष्मण जगधने,ईलाही कुरैशी, राजूभाई पठाण वकील, अजय जगधने व इतर वंचित बहुजन आघाड़ीचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
ज्या पोलिस कर्मचाऱ्यांबाबत तक्रार केली होती. त्याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल व योग्य दखल घेतली जाईल, असे आश्वासन पोलीस उपविभागीय आधिकारी सुदर्शन मुंढे यांनी सांगितले. यावेळी शेवगावचे पोलीस निरीक्षक यांना तातडीने आंदोलनस्थळी बोलावून घेऊन संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
शेवगाव पोलीस ठाण्यातील काही पोलीस कर्मचारी तक्रार घेऊन येणाऱ्या व्यक्तींना अरेरावी करतात. एनसी दाखल करण्यासाठी १० ते २० हजार रुपयांची मागणी करतात.
पैसे दिले नाहीतर दिवसभर बसवून ठेवतात, असे गंभीर आरोप यावेळी चव्हाण यांनी आपल्या भाषणात केले.
Tags :
7779
10