पाथर्डी- तरच चांगला समाज निर्माण होईल.-भास्करराव पेरे
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
गावचे सरपंच, आमदार, खासदार, तलाठी, शिक्षक, ग्रामसेवक, पुढारी हे गावचे गुरुजी असतात. त्यांनी जर लोकांना योग्य मार्गदर्शन न केल्यास विद्यार्थी (लोक) बिघडतात.
ते योग्य मार्गाने जात नाहीत. त्यामुळे समाजातील या गुरुजींनी स्वतः बदलले पाहिजे, तरच चांगला समाज निर्माण होईल, असे प्रतिपादन आदर्श गाव पाटोद्याचे माजी सरपंच भास्करराव पेरे यांनी केले.
पाथर्डी तालुक्यातील वडगाव येथील श्रावणी सप्ताहानिमित्त 'एकविसाव्या शतकातील खेडे' या विषयावर आयोजित व्याख्यानात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ते म्हणाले, रासायनिक पद्धतीने शेती न करता सेंद्रिय पद्धतीने करा. त्यामुळे माणसाचे आयुर्मान वाढण्यास मदत होईल. प्रत्येक कुटुंबाने शौचालयाचा वापर करावा. त्यामुळे रोगराई मुक्त गाव होण्यास मदत होते.
यावेळी आमदार मोनिका राजळे यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या 'हर घर तिरंगा' अभियानासंबंधी गावकर्यांना माहिती देत सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी ठाण्याचे शिक्षणाधिकारी शेषराव बडे, सरपंच रंजना धनवे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष धनंजय बडे, डॉ. राजेंद्र खेडकर, आजिनाथ बडे, दगडू बडे, परमेश्वर गरड, गणेश बडे, उद्धव बडे आदी उपस्थित होते.