महाराष्ट्र
अट्टल दरोडेखोरांचा डाव उधळला : तीन गावठी कट्टा व 14 जिवंत काडतुसासह आरोपी संयुक्त कारवाईत जाळ्यात
By Admin
अट्टल दरोडेखोरांचा डाव उधळला : तीन गावठी कट्टा व 14 जिवंत काडतुसासह आरोपी संयुक्त कारवाईत जाळ्यात
पाथर्डी तालुक्यातील 'या' गावातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तीन दरोडेखोरांच्या नाशिक आयजींच्या पथकासह चोपडा ग्रामीण पोलिसांनी संयुक्त कारवाईत मुसक्या आवळल्या असून संशयीतांकडून तीन गावठी कट्टे, 14 जिवंत काडतुस व वस्तरा, चारचाकी वाहन जप्त करण्यात आले.
नाशिक येथील विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या पथकास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे बोरअजंटी- वैजापूर रस्त्यावरील तेल्या घाटात सापळा रचून स्कार्पियो गाडी (एमएच १२ एफय ००६१) भरधाव वेगाने जात असताना पोलिसांनी तिला थांबवली.
वाहनातील पाच जणांकडून तीन गावठी कट्टे व पंधरा काडतुसे, एक वस्तारा असा एकूण ६ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तीन जणांना अटक करण्यात आली तर दोन जण फरार झालेत. सदर कारवाई शनिवारी (ता. २८) रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास करण्यात आली.
दरोड्यापूर्वीच संशयीत जाळ्यात
चोपडा ते बोर अजंटी रस्त्यावर तेल्या घाटाखाली शनिवारी दुपारी 3 वाजता एका पांढर्या रंगाच्या स्कार्पिओ (एम.एच.12 एफ.यू.0051) या वाहनातून दरोड्याच्या तयारीत असलेल्या गणेश बाबासाहेब केदारे (24, पाडळी, ता.पाथर्डी, जि.अहमदनगर), कालिदास दत्तात्रय टकले (28, हरताळा, ता.पाथर्डी), विकास अप्पासाहेब गिरी (22, पाडळी, ता.पाथर्डी) यांना अटक करण्यात आली. संशयीताच्या ताब्यातून तीन गावठी कट्टे व 14 जिवंत काडतूसे तसेच तीन मोबाईल व दाढी करण्याच्या वस्तरा असा एकूण सहा लाख 34 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर उमर्टी मध्यप्रदेशातील दोन संशयीत पसार झाले. चोपडा ग्रामीण पोलिसांनी संशयीतांना अटक केली असून या प्रकरणी बशीर तडवी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
पोहेकॉ बशीर तडवी यांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमर्टी येथील फरार दोघींचा शोध सुरू आहे.
मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तीन दरोडेखोरांच्या नाशिक आयजींच्या पथकासह चोपडा ग्रामीण पोलिसांनी संयुक्त कारवाईत मुसक्या आवळल्या असून संशयीतांकडून तीन गावठी कट्टे, 14 जिवंत काडतुस व वस्तरा, चारचाकी वाहन जप्त करण्यात आले.
ही कारवाई शनिवार, 28 मे रोजी दुपारी तीन वाजता तेल्या घाटात करण्यात आली तर दोन संशयीत पसार झाले.
यांच्या पथकाने केली कारवाई
नाशिक येथील विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या पथकास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे बोरअजंटी- वैजापूर रस्त्यावरील तेल्या घाटात सापळा रचून स्कार्पियो गाडी (एमएच १२ एफय ००६१) भरधाव वेगाने जात असताना पोलिसांनी तिला थांबवली.
नाशिक आयजींच्या पथकातील वरीष्ठ पोलिस निरीक्षक बापू रोहोम, चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास कुनगर, विशेष पथकातील सहाय्यक निरीक्षक सचिन जाधव, चोपडा उपनिरीक्षक अमरसिंग वसावे, एएसआय बशीर तडवी, रामचंद्र बोरसे, सचिन धारणकर, शकील शेख, मनोज दुसाने, कुणाल मराठे, प्रमोद मंडलिक, नारायण लोहरे, चोपडा ग्रामीणचे हवालदार लक्ष्मण शिंमाणे व प्रमोद पारधी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Tags :
1040518
10