अल्पवयीन मुलीवर धक्कादायक प्रकार ; आरोपीला वर्षं दहा व सक्तमजुरी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात जिल्हा सत्र विशेष न्यायालयाने आरोपीला दोषी धरीत दहा वर्षं सक्तमजुरी व दहा हजार रुपयांचा दंडाची शिक्षा ठोठावली.
अमोल बाबासाहेब गीते (रा. 23, रा. वाळुंज, ता. पाथर्डी, जि. नगर) असे आरोपीचे नाव आहे. अधिक माहिती अशी, आरोपीचा जाण्या-येण्याचा रस्ता पीडितेच्या घराजवळून जात होता. एका दिवस पीडित मुलगी सकाळी घराशेजारी शेतामध्ये घास कापीत असताना आरोपी अमोल गिते तिथे आला. पीडितेला म्हणाला, तू माझ्या सोबत बोलत जा, तेव्हा पीडितेने नकार दिला. तू बोलली नाही तर, मी तुला व तुझ्या परिवारास जिवंत सोडणार नाही, अशी धमकी गितेने दिली.
त्यानंतर पीडिता घाबरून घरी पळून गेली. 1 ऑगस्ट 2020 रात्री पीडिता आईला सांगून रात्री शौचालयास बाहेर गेली. त्यावेळी आरोपीने तिच्या तोंडात रूमला घातला आणि शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. याबाबत पीडितेने वडील व चुलत्यांना माहिती दिली. पीडितेच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात अत्याचार व बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक डी. एम. राठोड यांनी गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. या खटल्यात सरकार पक्षातर्फे सात जणांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. सरकार पक्षाचा पुरावा व युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला वरीलप्रमाणे शिक्षा केली. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता अॅड. मंगेश दिवाणे यांनी बाजू मांडली.