लाकूड वाहतूक करणारी सात वाहने जप्त, 43 लाखांचा ऐवज जप्त
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील वनविभागाच्या कारवाईत तीन ट्रक, चार टेम्पो अशी लाकडाची भरलेली सात वाहने जप्त करण्यात आली आहेत. तोडलेले लाकूड, सात वाहने व दोन कटर, तीन जनरेटर असा एकूण सुमारे त्र्येचाळीस लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
पाथर्डी व शेवगाव तालुक्यात अवैधरीत्या झाडाची कत्तल केली जात असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी साबळे यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने पाथर्डी व शेवंगाव मधील विविध भागातून संयुक्तपणे छापे टाकत ही धडक कारवाई केली आहे.
चार टेम्पो, तीन ट्रक, तोडलेले लाकूड, इलेक्ट्रिक कटर, तीन जनरेटर व कुर्हाडी, लाकूड कापण्याची करवत आदी साहित्य जप्त केले.
उपवनसंरक्षक सुवर्णा माने, सहाय्यक वनसंरक्षक गोंदके यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण साबळे, वनपाल आल्हाट, शिरसाठ, वनरक्षक विजय पालवे, घनवट, हंडाळ, घोडके, गीते, शिरसाठ, रायकर, दराडे, पठाण, गिते, ढोले यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण साबळे हे करीत आहेत.