पाथर्डी- डॉ. मृणाली शिरसाट यांची नायब तहसीलदार पदी निवड
पाथर्डी - प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या डिसेंबर २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या राज्य सेवा परिक्षेचा निकाल ३१मे २०२२ ला जाहीर झाला आहे.
यापरीक्षे मध्ये पाथर्डी तालुक्यातील शिरसाट वाडी येथील डॉ.मृणाली अशोकराव शिरसाट यांची नायब तहसीलदार पदी निवड झाली आहे.
राज्य गुणवत्ता यादीत ५७ वा तर वंजारी (NT-D) प्रवर्गात मुलींमध्ये प्रथम येण्याचा मान पटकवला आहे.
या यशा बद्दल आमदार मोनिकाताई राजळे,केंद्रिय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य धनराज गुट्टे, अखिल भारतीय वंजारी युवा संघटन चे अहमदनगर जिल्हाध्यक्ष दादासाहेब फुंदे यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.