भालगांवच्या शिक्षिका पुष्पा फुंदे यांना गुरूकुल नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या कर्तव्यदक्ष शिक्षिका पुष्पा फुंदे- आंधळे यांना गुरुकुल मंडळाच्यावतीने गुरुकुल नारीशक्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
अहमदनगर येथील द्वारका लॉन्स कल्याण रोड, अहमदनगर येथे पार पडलेल्या भव्य पुरस्कार वितरण कार्यक्रमात पुष्पा फुंदे- आंधळे यांना अखिल भारतीय मराठी साहीत्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे व आमदार मोनिका राजळे यांचे हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
पुष्पा फुंदे या गेल्या १४ वर्षापासून भालगाव येथे कार्यरत आहे. त्यांची विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून परिसरात ख्याती आहे. शिष्यवृत्ती मार्गदर्शन, हस्ताक्षर प्रकल्प, बोलक्या भिंती, सांस्कृतिक कार्यक्रम असे वेगवेगळे विदयार्थीभिमुख कार्यक्रम राबवून आपल्या अध्यापनाचा वेगळा ठसा त्यांनी उमटवला आहे. त्यांच्या या कार्याची तसेच सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबदल सभापती सुनिताताई दौंड, जि.प. सदस्या प्रभावती ढाकणे, गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते, डॉ संजय कळमकर, भालगावच्या सरपंच डॉ.मनोरमाताई खेडकर, अभयकुमार वाव्हळ, महादेव आव्हाड, आजिनाथ खेडकर, विजय अकोलकर, अशोक आंधळे, सिताराम सावंत, बाळासाहेब खेडकर, संतोष पालवे,गंगाधर सुपेकर, सुरेश खेडकर बाळासाहेब गोल्हार, अण्णासाहेब आंधळे, बाबासाहेब जायभाये, संजय किर्तने, आरीफ बेग, प्रविण तुपे, अनुराधा फुंदे, संजीवनी दौंड, शहादेव काळे सुनिल ढाकणे, एकशिंगे,जगन्नाथ बडे, यांनी अभिनंदन करून कौतुकाचा वर्षाव केला.