महाराष्ट्र
भालगाव येथे मायंबा विठ्ठल रुक्मिणी अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात
By Admin
भालगाव येथे मायंबा विठ्ठल रुक्मिणी अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात
पाथर्डी- प्रतिनिधी
श्रीक्षेत्र मायंबा विठ्ठल रुक्मिणी संस्थान भालगाव येथील सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह श्री ह. भ. प. न्यायाचार्य महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री भगवानगड यांच्या अध्यक्षतेखाली व ह. भ. प. महंत निगमानंद महाराज मच्छिंद्रनाथ गड निमगाव यांच्या आशीर्वादाने ह. भ. प. महंत नवनाथ महाराज शास्त्री यांच्या कुशल मार्गदर्शनाने आणि समस्त भालगाव ग्रामस्थ, पंचक्रोशी परिसराच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात झाली आहे.
यावेळी ग्रामस्थांच्या वतीने संत महंताची गावातून भव्य अशी मिरवणूक करून स्वागत करण्यात आले.
श्रीक्षेत्र मायंबा विठ्ठल रुक्माई संस्थान भालगाव यांच्या हा ३३ वा वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह गडावर ७ एप्रिल रोजी आरंभ झाला असून, त्याची सांगता १४ एप्रिल रोजी होणार आहे. सप्ताहातील दैनिक कार्यक्रमाची रूप रेषा- दररोज पहाटे काकडा, विष्णुसहस्रनाम, गीता पाठ व ज्ञानेश्वरी पारायण सकाळी ९ ते ११ तुकाराम महाराज गाथा, भजन ,रामायण कथा, ज्ञानेश्वरी प्रवचन, हरिपाठ सायंकाळी भोजन ,संगीत भजन, रात्री ९ ते ११ हरिकीर्तन व रात्री हरिजागर. हरिनाम सप्ताहाची सुरुवात दि. ७ एप्रिल रोजी ह-भ-प रामगिरी महाराज यांच्या किर्तन रुपी सेवेने झाली आहे. ह. भ. प. महादेव महाराज रसाळ, पुणे. ह.भ.प. हरिदास महाराज शास्त्री देवाची आळंदी, ह. भ. प. महेंद्र महाराज शास्त्री भगवानगड कर यांचे रामनवमीनिमित्त दुपारी कीर्तन व संध्याकाळी ह. भ. प. शिवशाहीर कल्याण काळे, शेवगाव ह-भ-प रामेश्वर महाराज शास्त्री ब्रह्मनाथ संस्थान ब्रम्हनाथ येळम, ह.भ.प. वेदांत चार्य महंत विवेकानंद शास्त्री सिद्धेश्वर संस्थान शिरूर कासार यांचे कीर्तन होणार आहे. आहे तसेच गुरुवार दि. १४ एप्रिल रोजी सकाळी ११ ते १ ह. भ. प. नवनाथ महाराज शास्त्री, मायंबा विठ्ठल रुक्मिणी संस्थान भालगाव यांचे अमृततुल्य असे काल्याचे किर्तन होणार आहे. व नंतर भागवत निवृत्ती सुपेकर मच्छिंद्रनगर व भालगाव यांच्या महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होईल. या कार्यक्रमाचा संपूर्ण भालगाव पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा, असे ह. भ. प. महंत नवनाथ महाराज शास्त्री व समस्त गावकरी मंडळी यांनी आवाहन केले आहे.
Tags :
8261
10