ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूका,'या' दिवशी मतदान होणार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
निधन, राजीनामा, अपात्रता व इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्य पदासाठी पोट निवडणूकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
5 जून 2022 रोजी मतदार घेण्यात येणार आहे. 6 जून 2022 रोजी निकाल घोषित करण्यात येणार आहे. अशी माहिती प्रसिध्दी पत्रकान्वये अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे.
राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी जाहीर केलेल्या ग्रामपंचायत पोटनिवडणूकांचे सूचना देणारे परिपत्रक अहमदनगर जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी यांना पाठविले आहे.
निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार तारीख निहाय निवडणूक कार्यक्रम घेण्यात यावा. अशा सूचना या परिपत्रकांत देण्यात आल्या आहेत. या निवडणूकांसाठी 13 मे 2022 ते 20 मे 2022 या कालावधीत उमेदवारी अर्ज (नामनिर्देशनपत्र) दाखल करता येईल. अर्जाची छाननी 23 मे 2022 रोजी करण्यात येणार असून 25 मे 2022 रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेता येईल. 5 जून 2022 रोजी मतदान होणार आहे. 6 जून 2022 रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.
सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी निवडणूक आयोगाच्या २९ एप्रिल २०२२ मधील परिपत्रकातील सूचनांचे तंतोतत पालन करून सदर पोटनिवडणूकांचा कार्यक्रम राबवावा. अशा सूचना ही ग्रामपंचायत निवडणूक शाखेने दिल्या आहेत.