अहमदनगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी कोण? बाळासाहेब थोरात म्हणतात असा निर्णय घेणार
अहमदनगर- प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक पार पडली. यावेळच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजप अशी थेट लढत पाहायला मिळाली. एकूण 21 जागांपैकी 17 जागांवर बिनविरोध निवड झाली. बाकीच्या 4 जागांसाठीचे मतदान होऊन आज मतमोजणी पार पडली.
त्यांनतर आता जिल्हा बँकेचा पुढचा अध्यक्ष कोण याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.
याविषयी बोलताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे.
21 पैकी 17 जागांवर बिनविरोध निवड झाली असली तरी उर्वरित 4 जागांसाठीची निवडणूक अतीशय चुरशीची झाली. भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डीले हे सुद्धा मोठ्या फरकाने निवडून आले. महाविकास आघाडीकडे 14 तर भाजपकडे 7 जागा आहेत.
बँकेच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याविषयी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जिल्हा बँकेत आम्ही राजकारण करत नाही. पदाधिकारी निवड प्रक्रियेत आम्ही सर्व एकत्र बसून निर्णय घेऊ तसेच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय हे आमचं सूत्र असून ते आम्ही टिकवतो, असेही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.