महाराष्ट्र
जनतेचा घोंगडी बैठकांना उस्फुर्त पाठिंबा म्हणजे परिवर्तनाची नांदी- प्रा. किसन चव्हाण
By Admin
जनतेचा घोंगडी बैठकांना उस्फुर्त पाठिंबा म्हणजे परिवर्तनाची नांदी- प्रा. किसन चव्हाण
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी- शेवगाव तालुक्यात जनतेचे प्रश्न मार्गी लागावे, यासाठी सुरू केलेल्या घोंगडी बैठक अभियानास गावागावातून जोरदार प्रतिसाद मिळत असून गावोगाव जनतेतून घोंगडी बैठकीची मागणी होत आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लागत असल्याने सर्व जातीय, सर्व धर्मीय लोकांचा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत आहे.हा पाठिंबा म्हणजे या भागातील कारखानदारांच्या विरोधातील परिवर्तनाची नांदी ठरणार आहे, असे प्रतिपादन वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांनी घोंगडी बैठकीत व्यक्त केले.
प्रभू पिंपरी आणि पागोरी पिंपळगाव येथे वंचित बहूजन आघाडी शाखा उद्घाटन व वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांची घोगंडी बैठक मंगळवारी भर पावसात संपन्न झाली. उत्साही युवक कार्यकर्त्यांनी फटाके तौफा वाजवून प्रा. किसन चव्हाण आणि त्यांच्या सोबत आलेले वंचित बहूजन आघाड़ीचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष प्रतिक बारसे, उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के,पाथर्डी तालुका अध्यक्ष रवींद्र उर्फ भोरु म्हस्के, शेवगांव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई, अहमदनगर जिल्हा महासचिव योगेश साठे यांचे मिरवणुकीने स्वागत केले. यावेळी वंचितचे ज्येष्ठ कार्यकर्ते विनायक देशमुख, दिलावर बागवान,पाथर्डी शहराध्यक्ष शेख इरफान, सोपान भिगांरे, लक्ष्मण मोरे, शेख सलीम जिलानी, अक्षय बळीद, आशिर्वाद कचरे, शेख राजूभाई, मनिष उबाळे,सतिश पालवे,बबन मुखेकर ,आकाश शिंदे,संतोष पवार,सतिश पालवे ,सखाराम कुसळकर,तसेच महीला समन्वयक धनश्री शेडंगे उपस्थित होते.
कार्यक्रमास पागोरी पिंपळगाव परिसरातील सर्व धर्मीय व सर्व जातीय तरुण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पागोरी पिंपळगाव येथील सभामडंपात प्रा. किसन चव्हाण यांच्या घोंगडी बैठकीस सुरवात झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सखाराम सिरसीम हे होते. या प्रसंगी वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे म्हणाले की, प्रा. किसन चव्हाण यांच्या घोंगडी बैठकीस आपण मोठ्या संख्येने उपस्थित आहात. या उपस्थित युवकांनी, ग्रामस्थांनी भविष्यात होणार्या निवडणूकीत मतदानाची भुमिका घ्यावी. शेख प्यारेलालभाई म्हणाले की, भरपावसात आपण मोठ्या संख्येने उपस्थित आहात, याचा अर्थ पुढील जि. प.,पंचायत समिती मध्ये आपण वंचित बहूजन आघाडीच्याच उमेद्वाराला निवडून देणार, कारण तुम्ही सर्व स्वाभिमानी आहात. ज्येष्ठ सामाजिक नेते जिवन पारधे म्हणाले, या असंख्य उपस्थितांनी आपली उपस्थितीचे परिवर्तन मतदानात दाखवावे. अरविंद सोनटक्के म्हणाले की, प्रा. किसन चव्हाण यांच्या घोंगडी बैठकीने विरोधकांचे धाबे दणाणले आहे. भोरू म्हस्के म्हणाले, वंचित बहूजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना पदाधिकार्यांना जाणीव पुर्वक त्रास देण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, अन्यथा त्यांना जशास तसे उत्तर देण्यात येईल.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बंटी नवगिरे,सतिष सिरसिम,मुनीरभाई पटेल,संदीप सिरसिम,अशोक जावळे,बबनभाऊ लांडगे,अनिकेत नवगिरे,योसेफ घोडके,काशिनाथ चव्हाण,सतीश नवगिरे,शकुरभाई शेख,विकास जावळे,राहुल जावळे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय कांबळे यांनी केले तर पागोरी पिंपळगाव शाखा अध्यक्ष बंटी नवगिरे यांनी सर्व उपस्थितीतांचे आभार मानले.
Tags :
98019
10