दुचाकी लर्निंग लायसन्सचे मोफत वितरण
अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम
पाथर्डी- प्रतिनिधी
युवकांमध्ये दुचाकी चालविण्याची वाढती क्रेझ पाहता रहदारीबरोबरच अपघातांच्या घटनांमध्येही वाढ होताना दिसत आहे. आजच्या युवकांनी रहदारीचे नियम पाळणे आवश्यक असले तरी अजाणतेपणामुळे त्यांच्याकडून याकडे दुर्लक्ष होते.
बहुतांस युवक ड्रायव्हिंग लायसन काढत नाहीत. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी अडवल्यावर नाहक दंड भरावा लागतो. अपघात झाल्यावर ड्रायव्हिंग लायसन नसल्यामुळे विम्या कंपन्याकडून क्लेम मंजूर होण्यात अडचणी निर्माण होतात. ड्रायव्हिंग लायसन्सची ही गरज लक्षात घेता येथील अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठानकडून माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत दुचाकी लर्निंग लायसन्स वितरण समारंभाचे आयोजन बाबुजी आव्हाड महाविद्यालयात करण्यात आले.
यावेळी पाथर्डी शहरातील ११६ युवक व युवतींना प्रतिष्ठानमार्फत मोफत दुचाकी ड्रायव्हिंग लायसन्स वितरण अभय आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी श्री विवेकानंद विद्या मंदिरचे मुख्याध्यापक प्रा. शरद मेढे, गणेश विधाते, सारिका तामखाने, आदी उपस्थित होते.
वितरण समारंभाचे प्रास्ताविक डॉ. बबन चौरे तर आभार प्रा. किरण गुलदगड यांनी मानले.