पाथर्डीची अनुष्का खंडागळे दिसणार 'महाराष्ट्राची हास्य जत्रा'च्या मंचावर
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी शहरातील रहिवाशी बिपिन खंडागळे यांची कन्या अनुष्का खंडागळे हिची 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' या प्रसिद्ध कार्यक्रमात निवड झाली असून रविवारी दि. २१ रोजी सकाळी ११:३० वाजता सोनी टीव्ही मराठी वर हा कार्यक्रम प्रदर्शित होणार आहे.
सध्या सोनी मराठी या वाहिनीवर गाजत असलेला, प्रेक्षकांना निखळ आनंद देणारा आणि सर्वांच्या मनामध्ये मनाचे स्थान असलेला कार्यक्रम म्हणजे"महाराष्ट्राची हास्य जत्रा " हा कार्यक्रम.
या कार्यक्रमाचे चाहते संपूर्ण भारतात आणि भारताबाहेरही आहेत. अशीच एक चाहती, अहमदनगर जिल्ह्यातील, पाथर्डी तालुक्यातील कु. अनुष्का बिपिन खंडागळे ही मुलगी आय.टी.इंजिनियरिंगच्या तिसऱ्या वर्षाला शिक्षण घेत आहे. तिला कलेची आवड आहे.महाराष्ट्राची हास्य जत्रा ह्या कार्यक्रमाची ती अशीच एक चाहती आहे.
ह्या कार्यक्रमाच्या आवडीमुळे तिने इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर एक अकाउंट ओपन केले. एका वर्षाच्या आत या पेजने २२, ००० फॉलोअर्स चा टप्पा पार केला. याची दखल अधिकृत सोनी मराठी वाहिनीकडून घेण्यात आली आणि तिला सेटवर येण्यासाठी विचारणा करण्यात आली. हा कार्यक्रम २१ ऑगस्टला सकाळी ११:३० वाजता सोनी मराठी या वाहिनीवर "गॉसिप आणि बरंच काही" या हास्य जत्रेच्या नव्या कार्यक्रमाचा पहिलाच एपिसोड प्रदर्शित होणार आहे. तरी हा कार्यक्रम आपण सर्वांनी पाहावा, असे आवाहन बिपिन खंडागळे यांनी केले आहे. या तिच्या निवडीबद्दल मित्रमंडळी आणि आप्तेष्टांकडून तिचे अभिनंदन होत आहे.