महाराष्ट्र
925
10
आज 'या' 18 जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता, आठवडाभर असे असेल हवामान
By Admin
आज 'या' 18 जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता, आठवडाभर असे असेल हवामान
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
या आठवड्यात देखील पावसाची (Monsoon) प्रक्रिया सुरू राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे.
मुंबई हवामान केंद्राने वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, आज पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, लातूर, विदर्भातील उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने हवामान केंद्र मुंबईने या संबंधित जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे.
मंगळवारी कसं असेल हवामान
तसेच, उद्या देखील राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्या कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. पावसाची शक्यता लक्षात घेता या संबंधीत जिल्हयांना मंगळवारसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
बुधवारी कसं असेल हवामान
बुधवाऱी देखील राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. बुधवारी हवामान केंद्र मुंबईने कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग; पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर; मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविली असून संबंधित जिल्ह्यांना यलो अलर्ट देखील हवामान केंद्र मुंबईने जारी केला आहे.
गुरुवाऱी कसं असेल हवामान
यानंतर गुरुवारी देखील राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होतं आहे. गुरुवारी राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. या अनुषंगाने हवामान केंद्र मुंबईने यासंबंधी जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
शुक्रवार आणि शनिवारी कस असेल हवामान
यानंतर शुक्रवार आणि शनिवारीही राज्यातील अनेक जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान केंद्र मुंबईने वर्तवली आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, काल देखील राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची हजेरी बघायला मिळाली. रविवारी राज्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरूच होता.
Tags :

