महाराष्ट्र
माणिकदौंडी घाटातील गर्भगिरीच्या डोंगरावर दीड हजार वृक्षांची लागवड
By Admin
माणिकदौंडी घाटातील गर्भगिरीच्या डोंगरावर दीड हजार वृक्षांची लागवड
श्री तिलोक जैन परिवाराने अहमदनगर जिल्हापुढे निर्माण केला आदर्श
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी घाटात गर्भगिरीच्या डोंगरावर श्री तिलोक जैन परिवाराने एका तासात सुमारे अकराशे पन्नास झाडांची लागवड करत अहमदनगर जिल्ह्यापुढे वृक्षारोपणात एक आदर्श निर्माण केला आहे. या लागवडी दरम्यान 'झाडे लावू गड्यांनो, झाडे लावू' या गाण्यावर विद्यार्थ्यांनी झाडे लावून नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यात आली.
माणिकदौंडी घाटातील गर्भगिरीच्या डोंगरावर श्री तिलोक जैन परिवाराने एका तासात ११५० झाडे लावून आपला वेगळा ठसा उमठवला .झाडे लावण्याच्या या मोहिमेमध्ये सुमारे ३०० महाविद्यालयीन तसेच कनिष्ट महाविद्यालयीन विद्यार्थी ,११० शिक्षक व संस्थाचालक सहभागी झाले होते.'झाडे लावू गड्यांनो, चला झाडे लावू' या गाण्यावर विद्यार्थांनी झाडे लावली.
रविवारी पाथर्डी शहरातून श्री आनंद महाविद्यालय ,श्री तिलोक जैन विद्यालय तसेच श्री आनंद कॉलेज ऑफ फार्मसी मधील सुमारे ३०० विद्यार्थी माणिकदौंडी येथील गर्भगिरीच्या डोंगरावर पोहोचली.त्या ठिकाणी आमदार मोनिका राजळे यांचे हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी माजी समाजकल्याण सभापती अर्जुनराव शिरसाट, माजी पंचायत समिती सदस्य सुनील ओव्हळ,माजी नगराध्यक्ष अभयराव आव्हाड,श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे खजिनदार सुरेश कुचेरिया,विश्वस्त धरमचंद गुगळे ,डॉ. सचिन गांधी ,चांदमल देसरडा,विजय लुणावत ,माजी सभापती काकासाहेब शिंदे ,शिवाजीराव मोहिते ,धनगरवाडीचे सरपंच मिठू चितळे ,अशोक गाडे आदीसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.झाडे लावण्यासाठी पाच विद्यार्थी व एक शिक्षक असे सुमारे ५० ग्रूप करण्यात आले होते. प्रत्येक ग्रूपने किमान २५ झाडे लावावेत, असे नियोजन करण्यात आले होते. त्या नुसार सुमारे ३०० विद्यार्थांनी एका तासात ११५० झाडे लावली. झाडे लावल्यानंतर खड्ड्यात माती टाकून त्यावर पाणी टाकण्यात आले.'झाडे लावू गड्यांनो, चला झाडे लावू' या गाण्यावर विद्यार्थांनी मनसोक्त आनंद घेत झाडे लावली. त्या नंतर विद्यार्थांनी त्याच ठिकाणी वनभोजनाचा आस्वाद घेतला.
या वेळी बोलतांना आमदार मोनिका राजळे म्हणाल्या ,शैक्षणिक क्षेत्राबरोबर सामाजिक उपक्रमात श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळ ही संस्था कायम अग्रेसर असते. या पूर्वी सुद्धा कोरोना काळात या संस्थेने मोठे काम केले होते.आज वृक्ष लागवडीचा त्यांनी घेतलेला उपक्रम स्तुत्य असा आहे.संस्था जे काही सामाजिक उपक्रम राबवीत आहेत, त्या उपक्रमात आम्हालाही सहभागी करून घ्या. जी जी मदत लागेल, ती आमच्याकडून दिली जाईल, अशी ग्वाही राजळे यांनी या वेळी दिली.या वेळी अर्जुनराव शिरसाट यानीहि या उपक्रमाचे कौतुक करत समाजउपयोगी कामे करणाऱ्या बरोबर आम्ही कायम स्वरूपी राहू असेही ते म्हणाले.
प्रास्ताविक संस्थेचे सचिव सतीश गुगळे ,सूत्रसंचालन डॉ मुक्तार शेख .स्वागत डॉ. इस्माईल शेख तर आभार प्रा सुर्यकांत काळोखे यांनी मानले.
कार्यक्रमास प्राचार्य डॉ. शेषराव पवार ,प्राचार्य विलास भगत,माणिकदौंडीचे मुख्याध्यापक राजाराम माळी,उपमुख्याधापक विजय छाजेड,दिलावर फकीर ,विजय घोडके आदि उपस्थित होते.वनस्पती शास्र विभागाचे प्रमुख डॉ. जगन्नाथ बर्शिले यांनी झाडे लावण्यासाठी विद्यार्थांना मार्गदर्शन केले.
राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराजांचे सुशिष्य उपाध्याय प्रवर प.पू.प्रवीणऋषीजी महाराज हे गर्भगिरीच्या डोंगरावरून पायी भ्रमंती करीत असतांना पूर्वी या डोंगरावर घनदाट झाडी होती व आजची परिस्थिती पाहून त्यांनी श्री तिलोक जैन परिवाराने या डोंगराला पूर्वी सारखे वैभव प्राप्त करण्यासाठी डोंगर रागावर वृक्ष लागवड करा, असा आदेश दिला. त्या नुसार आम्ही डोंगरावर झाडे लावण्याच्या उपक्रम घेतला आहे.
सतिश गुगळे
सचिव
तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळ, पाथर्डी.
Tags :
151
10