चारा छावणीच्या 3 लाख 92 हजार रुपयांच्या थकित बिलासाठी उपोषण
पाथर्डी- प्रतिनिधी
नियमाप्रमाणे मोहोज खुर्द तालुका पाथर्डी येथे चारा छावणी चालवून देखील त्याचे बील अद्यापि मिळाले नसल्याने,सदरील बील त्वरीत मिळण्याच्...
अहमदनगर : नियमाप्रमाणे मोहोज खुर्द तालुका पाथर्डी येथे चारा छावणी चालवून देखील त्याचे बील अद्यापि मिळाले नसल्याने,सदरील बील त्वरीत मिळण्याच्या मागणीसाठी सिध्दार्थ सहकारी दुध उत्पा दक संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयजवळील भूजल सर्वेक्षण कार्यालयाच्या आवारात उपोषण करण्यात आले.
या उपोषणात संस्थेचे चेअरमन जे.बी.वांढेकर,संचालिका लता वांढेकर,रामनाथ म्हस्के,मंदा वांढेकर, मंगल सोनवणे सहभागी झाले होते. मोहोज खुर्द (तालुका पाथर्डी) येथील सिद्धार्थ सहकारी दूध उत्पादक संस्थेने १ ऑगस्ट ते १० सप्टेंबर २०१९ दरम्यान पाथर्डी उपविभागीय अधिकारी यांनी छावणीला परवानगी दिली होती.
महसूल व वन विभाग यांच्या कडील शासन निर्णयाच्या आदेशाला अधीन राहून १५० जनावरांची अट शिथील करून संस्थेला छावणीची परवानगी देण्यात आली होती. त्याप्रमाणे छावणी सुरु होती.आदेश यापुढे कायम केला होता. तर त्यानंतर पाऊस पुरेसा झाला नसल्याने शासनाने पुन्हा शासन निर्णयाप्रमाणे छावण्यांना मुदत वाढ दिली.त्याप्रमाणे तहसीलदार यांनी दैनंदिन अहवाल स्वीकारलेला आहे..सर्व छावण्या शासन निर्णयाप्रमाणे चालवण्यात आल्या असून त्याचे बीलही शासनाने दिले आहे.परंतु सिद्धार्थ सहकारी दूध उत्पादक संस्थेने चालवलेल्या छावणीचे बील नाकारण्यात आले असून, नियमा प्रमाणे छावणी चालवून देखील बील नाकारणार्यांवर कारवाई करावी व थकित बील त्वरीत मिळण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.