महाराष्ट्र
शेकटे सोसायटीवर जय बाजरंग शेतकरी विकास मंडळाचे वर्चस्व अबाधित
By Admin
शेकटे सोसायटीवर जय बाजरंग शेतकरी विकास मंडळाचे वर्चस्व अबाधित
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील अतिशय चुरशीने लढविल्या गेलेल्या, शेकटे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत डॉ. अशोक घुले यांच्या नेतृत्वाखालील जय बजरंग शेतकरी विकास मंडळाने १२ पैकी दहा जागेवर दणदणीत विजय मिळवला आहे. विरोधी मंडळाला अवघ्या दोन जागेवर समाधान मानावे लागले तर एका जागेवर निवडणूक लढवली गेली नाही. निवडणुकीत मंडळाचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढील प्रमाणे. कर्जदार गटः भागवत साबळे (१३९), बाबासाहेब जगन्नाथ घुले (१३५), देविदास घुले (१२४), बाबासाहेब निवृत्ती घुले (११९), दिगंबर विठोबा घुले(११८), जगन्नाथ साबळे (११३), महिला राखीवः कांताबाई घुले (१२७), भिमाबाई घुले (१४३), इतर मागास वर्गीयः विष्णू दुर्गे (१३६) तर भटक्या विमुक्त मतदार संघातून जालिंदर फुंदे (१३८) मतांनी विजयी झाले. एकूण २५४ मतदानांपैकी २४८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, त्यापैकी २३ मते अवैध ठरली.
"आमच्या पराभवासाठी विरोधकांनी देव पाण्यात ठेवले होते, परंतु सामान्य मतदारांनी त्यांना मतपत्रिकेद्वारे चोख उत्तर दिले. मागील निवडणुकीतही मतदारांनी दिलेल्या चांगल्या प्रतिसादाची परंपरा कायम ठेवून मंडळास पुन्हा शेतकरी सेवेची संधी दिली. जय बजरंग शेतकरी मंडळाचा विजय शेतकरी सभासदांना समर्पित करून शेतकरी हितासाठी यापुढेही संस्थेचे कार्य सुरूच राहील." असे मंडळाचे नेतृत्व करणारे शेकटे गावचे उपसरपंच डॉ.अशोक घुले यांनी सांगितले.
या विजयासाठी अंबादास तुकाराम घुले, नामदेव फुंदे, प्रा.राजकुमार घुले, नवनाथ घुले, जनार्दन घुले, काकासाहेब घुले, बुवासाहेब घुले, मल्हारी घुले, शेषराव केदार, विठ्ठल साबळे, लिंबाजी घुले, पांडुरंग घुले, अशोक दादा घुले, शहादेव फुंदे, अंबादास साबळे, गंगाराम साबळे, सुभाष घुले, विठ्ठल लक्ष्मण घुले आदींनी विशेष परिश्रम घेतले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नाना भाऊसाहेब चोथे यांनी काम पाहिले. त्यांना एकनाथ राठोड, थोरात मॅडम, सचिव- घुगे भाऊसाहेब यांनी सहकार्य केले. आ. मोनिकाताई राजळे यांनी सर्व नवनिर्वाचित उमेदवारांचे व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.
Tags :
214
10