अशोकराव ढाकणे यांचे हदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथील अशोकराव दत्तात्रय ढाकणे यांचे शनिवारी दुःखद निधन झाले.
राष्टीय शेतकरी युनीयनचे जिल्हाध्यक्ष तथा भाजपा किसान मोचाचे सरचिटणीस शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे यांचे थोरले बंधू अशोकराव दत्तात्रय ढाकणे वय ५३ वर्षे यांचे हदय विकाराच्या तीव्र झटक्याने शनिवार दिनांक १८ जुन रोजी सकाळी ९.४५ वाजता निधन झाले.
त्यांच्या मागे बंधू बाळासाहेब, पत्नी, एक मुलगा, तीन मुली, जावई असा परीवार आहे.
अशोकराव ढाकणे हे धार्मीक व सरळ शांत, संयमी स्वभावाचे व्यक्तिमत्व होते. ते मोहटादेवीचे परमभक्त होते व गावामध्ये सर्वामध्ये मिळुन मिसळुन राहणाऱ्या व्यक्तिमत्वाचे अचानक हदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्यामुळे तसेच अशोकराव ढाकणे यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण पागोरी पिंपळगांव व त्यांच्या नातेवाईकांना चूरका लागुन गेला आहे. तसेच पागोरी पिंपळगांव व परीसरातील शांत संयमी व्यक्ती हरपल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.