अहमदनगर जिल्ह्यातील आजच्या ठळक घडामोडी - बातमीपञ
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी 17 मे 2021,सोमवार
अहमदनगर शहरात किराणा दुकाने, भाजीपाला, फळबाजार, मांस विक्री त्याचबराेबर शेती अवजारांची दुकाने 1 जूनपर्यंत बंद; महापालिका आयुक्त शंकर गाेरे यांचा आदेश
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 36 तासांत 2 हजार 882 जणांना काेराेना संसर्गाचं निदान; उपचारानंतर काल 3 हजार 296 रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडले
काेव्हिशिल्डचा दुसरा डाेस 84 दिवसांनंतर मिळणार; केंद्र सरकारच्या निर्णयानंतर अहमदनगर महापालिकेचे पत्रक
श्रीरामपूरमध्ये दाेन दिवसांनी उपलब्ध झालेल्या काॅव्हॅक्सिनचा डाेस घेण्यासाठी केंद्राबाहेर काल मध्यरात्री लांबच लांब रांगा; मात्र, पुरेसे डाेस उपलब्ध न झाल्यानं नागरिकांमध्ये नाराजी
पाथर्डीत लसीकरण केंद्रावर लसीकरणाच्या अगाेदर रॅपिड अँटीजेन चाचणी हाेणार; अंमलबजावणी सुरू होताच अनेक जण लस टाेचून घेण्यापूर्वी केंद्रावरून निघून गेले
संगमनेर येथील अमृतवाहिनी पाॅलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या सेल्फ रिचार्ज इलेक्ट्रिकल बायसिकल प्राेजेक्टला ऑस्ट्रेलियन पेटंटची मान्यता
महागाईविराेधात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आज जिल्हाभर आंदाेलन; जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना आज दुपारी निवेदन देणार
ज्येष्ठ संगीत तज्ज्ञ, संस्कृत अभ्यासक डाॅ. मधुसूदन बाेपर्डीकर यांचे काल पहाटे निधन; संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी महाकवी कालिदास पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी त्यांना गाैरविण्यात आले हाेते
अहमदनगर जिल्ह्यात सध्या 22 हजार 16 काेराेनाबाधितांवर उपचार सुरू; रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण सुमारे 90 टक्क्यांवर
काेराेना उपचारादरम्यान काल 31 जणांच्या मृत्यूची नाेंद; जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 481 जणांचा मृत्यू