पोलिसाकडून 'इतक्या' लाखाचा दंड वसूल महीनाभरात कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्यावर कारवाई
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 19 मे 2021, बुधवार
अहमदनगर जिल्ह्यात कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्या 19 हजार 449 व्यक्तींवर कारवाई करीत, जिल्हा पोलीस दलाने एका महिन्यात 81 लाख 75 हजार 300 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
कोरोनाची दुसरी लाट थांबविण्यासाठी मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, असे नियम प्रशासनाने लागू केले आहेत. मात्र, हे नियम मोडणारे व लॉकडाऊन काळात दुकाने उघडी ठेवणार्यांवर पोलीस दलाने कारवाई केली आहे. सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणार्या 8 हजार 5 बहाद्दरांकडून 39 लाख 68 हजार 100 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणार्या 7 हजार 931 व्यक्तींना 27 लाख 41 हजार 400 रुपये दंड ठोठावला. तंबाखू, मावा खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्या 3 हजार 39 व्यक्तींकडून सहा लाख 94 हजार 300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. रेस्टॉरंट व बार उघडे ठेवणार्या 8 मालकांकडून 59 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. किराणा, औषधे आणि भाजीपाला, दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री करणारी दुकाने सोडून, इतर दुकाने उघडणार्या 465 दुकानदारांना सात लाख दोन हजार 500 रुपये दंड ठोठावला आहे. एका मंगल कार्यालयासही दहा हजारांचा दंड ठोठावण्यात आला.