महाराष्ट्र
31820
10
पाथर्डीतील ८३ ग्रामपंचायत आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर ११ व १२ रोजी
By Admin
पाथर्डीतील ८३ ग्रामपंचायत आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर ११ व १२ रोजी विशेष ग्रामसभांत काढली जाणार सदस्य पदांची आरक्षण सोडत
पाथर्डी तालुक्यातील सन २०२४ व
२०२५मध्ये मुदत संपलेल्या, तसेच सन - २०२६मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापन झालेल्या - ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया वेगाने सुरू झाली - असून, निवडणुकीस पात्र असलेल्या - बिगर व अंशतः अनुसूचित क्षेत्रातील - ग्रामपंचायतींमधील सदस्य पदांच्या - आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या प्रक्रियेत तालुक्यातील तब्बल ८३ ग्रामपंचायतींचा समावेश असून, ११ व १२ जून रोजी विशेष ग्रामसभांमधून आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तहसील प्रशासनाने आरक्षण निश्चितीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार ८ रोजी विशेष ग्रामसभेची सूचना देण्यात येणार आहे.
त्यानंतर ११ व १२ रोजी तहसीलदारांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा घेऊन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, तसेच सर्वसाधारण महिला या प्रवर्गांसाठी सदस्य पदांची आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. सोडतीनंतर १७ रोजी जिल्हाधिकारी प्रभागनिहाय आरक्षणाच्या प्रारूप अधिसूचनेस मान्यता देतील. १९ रोजी प्रारूप आरक्षण प्रसिद्ध करण्यात येणार असून, १९ ते २५ जून या कालावधीत हरकती व सूचना स्वीकारल्या जाणार आहेत. प्राप्त हरकतींवर विचार करून उपविभागीय अधिकारी ३ जुलैपर्यंत अभिप्राय सादर करतील. त्यानंतर ८ जुलै रोजी जिल्हाधिकारी अंतिम अधिसूचनेस मान्यता देतील आणि १०
जुलै रोजी अंतिम प्रभाग रचना व आरक्षणाची व्यापक प्रसिद्धी करण्यात येणार आहे.
आरक्षण सोडतीमध्ये एकनाथवाडी, चिंचपूर इजदे, भारजवाडी, कौडगाव, जोगेवाडी, पिंपळगव्हाण, करोडी, पिंपळगाव टप्पा, कामत शिंगवे, पागोरी पिंपळगाव, आगसखांड, वाळूज, भिलवडे, रांजणी, अंबिकानगर, टाकळी मानूर, मोहटे, निपाणी जळगाव, खाडगाव, केळवंडी, मांडवे, शेकटे, शिरापूर, भुतेटाकळी, सातवड, कडगाव, धामणगाव, शिराळ, येळी, खेर्डे, कासार पिंपळगाव, घाटशिरस, शिंगवे केशव, कोकीसपीर तांडा, मिडसांगवी, मोहोज खुर्द, हनुमान टाकळी, पारेवाडी, लोहसर, धनगरवाडी, मोहोज बुद्रुक, पत्र्याचा तांडा, तिनखडी, मोहोजदेवढे, आडगाव, माळीबाभुळगाव, देवराई, जवखेडे दुमाला, चुंभळी, कोपरे,
आल्हणवाडी, औरंगपूर, मालेवाडी, कळसपिंप्री, चितळी, मुंगूसवाडे, तोंडोळी, सोमठाणे नलावडे, शंकरवाडी, खरवंडी कासार, बोरसेवाडी, ढाकणवाडी, जवळवाडी, सुसरे, नांदूर निंबादैत्य, मढी, मिरी, लांडकवाडी, कारेगाव, चितळवाडी, अकोला, भोसे, शिरसाठवाडी, दुलेचांदगाव, चिंचपूर पांगुळ, सोमठाणे खुर्द, पिरेवाडी, राघोहिवरे, माणिकदौंडी, सांगवी बुद्रुक, जाटदेवळे, घुमटवाडी आणि जांभळी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
तहसीलदार डॉ. उद्धव नाईक हे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे कामकाज पाहत असून, निवासी नायब तहसीलदार किशोर सानप हे त्यांना सहकार्य करीत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरक्षण सोडतीकडे संभाव्य इच्छुक उमेदवारांसह ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
Tags :
31820
10




