पाथर्डी- लसीकरण केंदावर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
By Admin
लसीकरण केंद्रावर सोशल डिस्टंसिंगचा फज्जा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 24 एप्रिल 2021
पाथर्डी तालुक्यात कोरोना चा पादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगावचे नागरिक कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी केंद्रावर गर्दी करत आहेत.पागोरी पिंपळगाव ला एकच लसीकरण केंद्र असल्याने नागरिकांची तुडुंब गर्दी दिसून येत असून शासनाने नेमून दिलेल्या नियमांना हरताळ फासला जात आहे.
दिवसेंदिवस कोरोनाचा पादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने शासनामार्फत कोरोना निर्बंध देखील लादले जात आहेत. त्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापने बंद ठेवून कडक निर्बंध लावण्यात आले असतांना देखील रुग्ण संख्या वाढत आहे. ऑक्सिजन बेड व इंजेक्शनचा वेळेत पुरवठा न झाल्याने अनेक रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत. त्याला प्रतिबंधक घालण्यासाठी नागरिक कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी गर्दी करत आहेत. पिंपळगावात एकच लसीकरण केंद्र असल्याने आरोग्य केंद्रावर सकाळपासून लोकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यात योग्य नियोजन नसल्याने फिजिकल डिस्टन्ससिंगचा पूर्णपणे फज्जा उडतांना दिसत आहे.
दरम्यान आरोग्य विभागाकडून जनतेला फिजिकल डिस्टन्स ठेवा, मास्कचा वापर करा, कोरोना लसीकरण केंद्रावर गर्दी करू, नका, शिस्त पाळा, असे आवाहन करण्यात येत आहे.
प्रतिक्रिया :
सध्या अपुऱ्या कर्मचाऱ्यांनाच लसीकरणाचे काम करावे लागत आहे. तसेच लोकांची उडालेली झुंबड रोखण्यात कर्मचाऱ्यांची निम्मी दमछाक होते. त्यातच या केंद्रात कार्यरत असलेले एक शिपाई व नर्स यांना कोरोनाची लागण झाली आहे. अशातच १ मे पासून अठरा वर्षावरील सर्वांनाच लस देण्याचे धोरण केंद्राने जाहीर केल्याने पुढील सात दिवसात लसीकरण केंद्रावर लस घेणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होणार आहे. त्यामुळे या गोष्टीचा प्रशासनाने आत्ताच विचार करून नियोजन करणे गरजेचे आहे.
– अक्षय मुळीक, वैद्यकीय अधिकारी
पागोरी पिंपळगाव- ता- पाथर्डी