कृषी तंत्र विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे गणवेश व गुलाब पुष्प वाटप करून स्वागत
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर येथील
दादापाटील राजळे शिक्षण संस्था आदिनाथनगर संचलित महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीशी संलग्न असलेले डॉ .अण्णासाहेब शिंदे कृषी तंत्र विद्यालय , आदिनाथनगर या कृषी तंत्र विद्यालयातील शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या प्रथम वर्ष अभ्यासक्रमासाठी प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांचे गणवेश व गुलाब पुष्प देवून स्वागत करण्यात आले .
भविष्यात कृषी क्षेत्राला येणारे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेता युवकांनी कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने गगन भरारी घेऊन संपन्न राष्ट्राच्या निर्मितीसाठी भरीव योगदान द्यावे असे विचार यावेळी शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक मा जे .आर . पवार यांनी व्यक्त केले .
कृषी विद्यापिठातील आधुनिक तंत्रज्ञान तसेच नवनवीन संशोधन सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यार्थ्यांनी कृषी क्षेत्रात सहभागी होणे आवश्यक असून विस्तारलेल्या कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कुशल उद्योजक तयार होणे गरजेचे असल्याने विद्यार्थ्यांना या क्षेत्रात करिअर करता येईल असे प्रतिपादन विद्यालयाचे प्राचार्य सुनील पानखडे यांनी केले .
यावेळी विद्यार्थ्यांचे गणवेश व गुलाब पुष्प देवून स्वागत करण्यात आले . यावेळी श्रा 'दादापाटील राजळे शिक्षण संस्थेचे विश्वस्त राहुलदादा राजळे , सचिव आर. जे . महाजन ,श्री. विक्रमराव राजळे , दादापाटील राजळे कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . राजधर टेमकर , डॉ .अण्णासाहेब शिंदे कृषी तंत्र विद्यालयाचे प्रा .मरकड एन . आर . श्री .किरण बोरुडे आदी मान्यवर व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा . संभाजी मरकड यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रा .राधिका अनारसे यांनी मानले .