पाथर्डीच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय अबॅकस स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश
पाथर्डी प्रतिनिधी:
इंस्पायर अबॅकस अकॅडमीच्या वतीने आळंदी येथे नुकत्याच घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धा परीक्षेत शिक्षिका सौ. संगिता खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डीतील विद्यार्थ्यांनी मोठे यश मिळवले. अवघ्या ५ मिंटांचा वेळ देऊन घेण्यात आलेल्या या परीक्षेत विद्यार्थ्यांनी १०० पेक्षा जास्त गणिते सोडवत आपली गुणवत्ता सिद्ध केली.
या स्पर्धेत स्वरा खंडागळे, गौरी काकडे, स्वरा पालवे, सयुरी वेताळ, श्रेया मगर, जिज्ञासा हराळ, अर्णवी उनबेग,अद्विता फुंदे, प्रेरणा बोरुडे, श्रेयस शिंदे, राशी भालेराव, अंकिता भालेराव, आश्लेषा तिजोरे, प्रांजल तिजोरे, चैतन्या खेडकर, आयुषी वेताळ, मयुरी सोनटक्के, ज्ञानेश्वरी तरटे या सर्व विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळवले. सर्व विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. या स्पर्धेत राज्यातील ९०० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे तालुक्यातून अभिनंदन करण्यात येत आहे.
इंस्पायर अबॅकस अकॅडमीच्या सर्वेसर्वा सौ. सत्यशीला भद्रे यांच्या हस्ते सौ. संगीता खंडागळे यांचा "बेस्ट टीचर अवॉर्ड" देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन करून परीक्षा यशस्वीरित्या पार पाडल्या बद्दल त्यांचे व अकॅडमीचे संचालक मंडळ आणि सर्व शिक्षकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.