महाराष्ट्र
38624
10
मेंढपाळांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने, चोरटे, बिबट्याचे
By Admin
एपीआय प्रल्हाद गिते यांना निलंबित करा
मेंढपाळांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने, चोरटे, बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी शस्त्र परवाना देण्याची मागणी
अहिल्यानगर जिल्ह्यात
वाढत चाललेल्या मेंढपाळांच्या अडवणुकीच्या घटना, चोरीचे गुन्हे, पोलिसांच्या कथित निष्क्रिय कार्यपद्धतीविरोधात महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलन संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी सकाळी जोरदार निदर्शने करण्यात आली.
या आंदोलनात अध्यक्ष सखाराम सरक, अशोक सब्बन, उपाध्यक्ष म्हंकाळ पांढरे, निलेश कोकरे, बापू खताळ, एकनाथ कोळपे, मुक्ताजी तांबे, नाथसाहेब सरक, पिराजी वाघे, देवराम कोळपे, बाळू सरक, ठाणा बरकडे, सिद्धू घुले, रामभाऊ घुले, पोपट टकले, गजानन गुलाल, गजानन गुलदगड,
दौलत कोळेकर, लक्ष्मण कोकरे, अॅड. कारभारी गवळी यांच्यासह मोठ्या संख्येने मेंढपाळ उपस्थित होते.
नगर तालुका पोलीस ठाण्याचे एपीआय प्रल्हाद गीते यांचे तत्काळ निलंबन करावे, जिल्ह्यातील प्रलंबित मेंढपाळ चोरीच्या गुन्ह्यांची तातडीने चौकशी
करून ऐवज परत द्यावा, तसेच मेंढपाळांना चोर, बिबट्यासारख्या वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी बंदुकीचा शख परवाना देण्यात यावा, अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी केल्या.
२७ नोव्हेंबर २०२५ रोजी मध्यरात्री चास गावच्या हद्दीत सिद्धू बिरू घुले या मेंढपाळावर
आ. पडळकर अधिवेशनात प्रश्न मांडणार...
मेंढपाळ बांधवांच्या या सर्व मागण्यांबाबत नागपूर येथे होणाऱ्या अधिवेशनात आमदार गोपीचंद पडळकर स्वतः प्रश्न उपस्थित करणार असल्याची माहिती सखाराम सरक यांनी दिली. मेंढपाळांच्या सुरक्षेचा प्रश्न शासनाने गांभीर्याने घेतला पाहिजे, अन्यथा जिल्ह्यातील मेंढपाळ समुदाय आंदोलन अधिक तीव्र करणार, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
सहा अज्ञात चोरांनी हल्ला करून सोने व रोकड लुटून नेली. या घटनेनंतर ११२ वर फोन केल्यावर पोलीस वाहन येऊन गेले, परंतु दुसऱ्या दिवशी फिर्याद नोंदवण्यासाठी मेंढपाळ पोलीस ठाण्यात गेल्यावर एपीआय गीते यांनी 'तुम्हीच चोर असून बनावट कांगावा करत आहात' अशी अपमानास्पद वागणूक देत चोरीची तक्रार नोंदवण्यास नकार दिल्याचा आरोप संघटनेने निवेदनात केला आहे. अखेर फक्त 'गहाळ एनसी' नोंदवण्यात आल्याचे सांगण्यात आले.
संघटनेने निवेदनात म्हटले की, जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात मागील अनेक वर्षापासून
मेंढपाळांच्या चोरीच्या तक्रारी प्रलंबित आहेत. काही गुन्ह्यांत आरोपींना जामीन मिळूनही पोलिसांनी मुद्देमाल परत करण्याची कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे मेंढपाळांचे आर्थिक नुकसान वाढत असून न्याय मिळण्याची आशा धूसर झाल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. शेतीपेक्षा जास्त स्थिर उत्पन्न देणारा मेंढपाळ व्यवसाय आज वाढत्या चोरी, दरोडे, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे संकटात सापडला आहे. सतत भीतीच्या वातावरणात कळप सांभाळणाऱ्या मेंढपाळांना स्वतःच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी शत्र परवाना देणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
Tags :
38624
10




