अहमदनगर मधील वैद्यकीय व्यवस्था नियंत्रणात असून संकटकाळात राजकारण करु नये…! - विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - मंगळवार 04 मे 2021
आज नगर जिल्ह्यात विरोधी पक्षनेते दरेकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात नगरमधील करोनास्थितीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी त्यांना नगरमधील सद्यस्थिती, रोज वाढणारी व बरी होणार्या रुग्णसंख्येची तसेच उपलब्ध वैद्यकीय सुविधांची माहिती दिली.
नगर जिल्ह्यात करोना संसर्ग झाल्याची आकडेवारी जास्त असली, तरी येथील वैद्यकीय व्यवस्था नियंत्रणात आहे. करोना रुग्णांसाठी आवश्यक असलेले बेड, व्हेंटीलेटरची व्यवस्था पुरेशी असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली असल्याचे विधान सभेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोेलताना सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात नगरमधील करोनास्थितीचा आढावा घेतला.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी त्यांना नगरमधील सद्यस्थिती, रोज वाढणारी व बरी होणार्या रुग्णसंख्येची तसेच उपलब्ध वैद्यकीय सुविधांची माहिती दिली.दरेकर यांनी वैद्यकीय सुविधाचा पुर्ण आढावा घेतला.
पोलीस अधीक्षक मनोज पाटील, आमदार बबनराव पाचपुते, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, माजी आमदार शिवाजीराव कर्डीले, महापौर बाबासाहेब वाकळे, महेंद्र गंधे, प्रसाद ढोकरीकर, अॅड.
अभय आगरकर, महापालिका आयुक्त शंकर गोरे, जिल्हा शल्यचिकित्सक सुनील पोखरणा आदींसह अधिकारी यावेळी उपस्थित होते.
नगरमध्ये ऑक्सिजनचा 60 ऐवजी 50 मेट्रिकटन पुरवठा होतो. दहा टनांची व्यवस्था करण्याचे काम सुरु आहे. रेमडेसिविरचाही पुरवठा व्हायला पाहिजे. त्यासाठी विशेष सूचना दिल्या आहेत. त्या संदर्भात काळजी घेण्याच्या सक्त सूचना प्रशासनाला दिल्या असल्याची माहिती दरेकर यांनी दिली.
संकटकाळात राजकारण करु नये…!
करोना संसर्गाचे मोठे संकट आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारला एकत्रित काम करावे लागेल. परंतुु दुर्देवाने प्रत्येकवेळी आपले अपयश झाकण्यासाठी राज्य सरकार केंद्रावर टीका करण्याचा प्रयत्न करते.
देशात लसीचा सर्वाधिक कोटा महाराष्ट्राला मिळाला. तरी देखील केंद्रावर टीका करण्याचे राज्य सरकारचे धोरणच चुकीचे आहे. केंद्र सरकारसोबत समन्वय ठेवूनच अनेक प्रश्न सुटणार आहेत, असेही दरेकर यावेळी म्हणाले.