महाराष्ट्र
1718
10
समाज परिवर्तन संस्थेच्या वतीने आरोग्य तपासणी व उपचार
By Admin
समाज परिवर्तन संस्थेच्या वतीने आरोग्य तपासणी व उपचार
अहिल्यानगर प्रतिनिधी :
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर येथे समाज परिवर्तन संस्था( F 23 78) व महानगरपालिका आरोग्य विभाग अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी चाचणी व उपचार व आरोग्य सल्ला करण्यात आला
कार्यक्रमाचे उद्घाटन अ. नगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे व मनपाचे इंजिनीयर
परिमल निकम यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिराच्या प्रसंगी समाज परिवर्तन संस्थेचे डॉ.भास्कर रणवरे, इंजिनीयर परिमल निकम यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांचे स्वागत केले.
आरोग्य शिबिराविषयी माहिती व प्रस्ताविक डॉ.भास्कर रणवरे यांनी केले. शिबिर आयोजित केल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. पंकज यांनी सदरच्या आरोग्य शिबिरा विषयी सविस्तर अशी माहिती डॉ. रणवरे यांच्याकडून घेतली व आरोग्य शिबिर आयोजित केल्याबद्दल समाज परिवर्तन संस्थाF 23 788, व महानगरपालिका यांच्या बद्दल गौरव उद्गार काढले. आरोग्य शिबिरामध्ये समाज परिवर्तन संस्थेचे संस्थापक संचालक प्रा. सदा पगारे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ.प्रकाश साळवे व आशिष साळवे यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाच्या शेवटी परिमल निकम,इंजिनिअर मनपाचे यांनी कार्यक्रमात आभार मानले.
या शिबिरासाठी यशवंत डांगे आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ. सतीश राजूरकर यांच्या देख रेखी खाली महानगरपालिका अहिल्यानगरच्या डॉ.आईशा शेख व त्यांचा स्टाफ व समाज परिवर्तन संस्थेचे डॉ.भास्कर रणनवरे ,श्री रोग तज्ञ डॉ. कल्पना रणनवरे , महानगरपालिकेचे. डॉ.आयेशा शेख, डॉ.अनुराधा इथापे, दिलीप नरोटे, रोहन शेळके (लॅब.टेक), मनोरमा थोरात, साळवे सिस्टर, डिके, पगारे, आल्हाट सिस्टर, अनिकेत गायकवाड, प्रदीप वाघमारे, नोमुल, बाळासाहेब घुमरे यांनी रुग्णाची तपासणी करून त्यांना योग्य तो उपचार व मार्गदर्शक सल्ला देण्यात आला उपस्थित रुग्णांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेऊन त्याचा अहवाल रुग्णांना देण्यात येणार आहे.
या आरोग्य शिबिरामध्ये 100 गुणांची तपासणी करून पन्नास रुग्णांची रक्त चाचण्या केलेल्या आहेत. ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज आहे ,अशांना महानगरपालिका व सिविल हॉस्पिटल अहिल्यानगर येथे पाठवून त्यांची मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रयत्न केले.
Tags :

