नाशिक- इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथिल भारत सर्व सेवा संघ शिक्षण संस्थेच्या
न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर काॕलेज कवडदरा विद्यालयाच्या मुलीची आज दि.०१ रोजी इगतपुरी येथे तालुकास्तरीय झालेल्या मैदानी ऍथलेटिक्स क्रिडा स्पर्धेत यश
१४ वर्ष- मुली १०० मी. स्पर्धेत विद्या भोरु रोंगटे हिने प्रथम क्रमांक मिळवला.व्दितीय क्रमांक - ४०० मी.मयुरी मनोहर गोडे,तृतीय क्रमांक - ४०० मी.कावेरी शांताराम म्हसळे,तसेच
१७ वर्ष वयोगत मुली
व्दितीय क्रमांक -कशिष नंदु रोंगटे,१९ वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक -२०० मी.-समिक्षा ज्ञानेश्वर हेमके,थाळीफेक स्पर्धा -१७ वर्षे
व्दितीय क्रमांक -तन्वी दिलीप कोकणे,
गोळाफेक स्पर्धा
१९ वर्षे -प्रथम क्रमांक -समिक्षा ज्ञानेश्वर हेमके हिने मिळवला असून या सर्व विद्यार्थ्यांची नाशिक जिल्हास्तरावर निवड झाली आहे.या सर्व विद्यार्थ्यांनी स्पर्धेसाठी केलेला सराव तसेच स्वतः मध्ये असलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर नेञदिपक यश मिळवले आहे.विद्यार्थी खेळाडूंना विद्यालयाचे क्रिडा मार्गदर्शक अमोल म्हस्के यांचे विशेष सहकार्य मिळाले.तसेच आई,वडील,पालक यांचे सहकार्य मोलाचे होते.या यशाबद्दल तालुक्यातून तसेच परीसरातून तसेच गावातील ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले.तसेच भारत सर्व सेवा संघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. राजेंद्रजी नलगे साहेब , सचिव प्रकाशजी जाधव साहेब ,तसेच सर्व संस्था संचालक मंडळ सदस्य पदाधिकारी,तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक/प्राचार्य बी.एस.पवार तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच माजी शिक्षक,माजी प्राचार्य तसेच सर्व माजी मुख्याध्यापक यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.