सहकार्य व स्पर्धात्मक वातावरण कामामधील गती व अचूकता
By Admin
सहकार्य व स्पर्धात्मक वातावरण कामामधील गती व अचूकता वाढवते- शिक्षण विस्ताराधिकारी रामनाथ कराड
शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांच्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न
पाथर्डी प्रतिनिधी:
शिक्षक व शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये शैक्षणिक, प्रशासकीय कौशल्य वृद्धिंगत साठी विविध पातळ्यांवर यशस्वी प्रयत्न शासनाकडून सुरू आहेत. परस्पर समन्वय, सहकार्य व स्पर्धात्मक वातावरण, कामामधील गती व अचूकता वाढवते असे मत शिक्षण विस्तार अधिकारी रामनाथ कराड कराड यांनी व्यक्त केले.
राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण संस्था, जिल्हा परिषद, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर व पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुक्यातील शिक्षक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा आव्हाड महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर शुक्रवारी संपन्न झाल्या. आगामी महिनाभर एकूण 43 प्रकारात होणाऱ्या स्पर्धेत विविध अधिकारी शिक्षक व कर्मचारी सहभागी होणार आहेत. सांघिक व वैयक्तिक क्रीडा स्पर्धा घेऊन तालुकास्तरीय स्पर्धांचे उद्घाटन प्राचार्य डॉ .बबन चौरे यांच्या हस्ते संपन्न झाले.
तालुकास्तरीय स्पर्धा समितीचे अध्यक्ष शिवाजी कराड , मुख्याध्यापक शरद मेढे, पर्यवेक्षक सलीम शेख यासह समितीचे सदस्य उपस्थित होते. या महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी व शनिवारी वर्धा संपन्न होणार आहेत. आज सांघिक स्पर्धा, खो खो, व्हॉलीबॉल, वैयक्तिक स्पर्धा, गोळा फेक, थाळीफेक, लांब उडी, उंच उडी अशा स्पर्धा संपन्न झाल्या. विजयी संघ व वैयक्तिक प्रकारात प्रथम आलेले स्पर्धक विभागीय स्तरावर पात्र ठरविण्यात आले आहेत. आजच्या स्पर्धांमध्ये अनेक महिला शिक्षकांनी सुद्धा उत्साहाने सहभाग नोंदवला.
यावेळी बोलताना कराड म्हणाले, एकसारख्या वातावरणात राहून मानसिक तणाव वाढत त्याचा कामकाजावर परिणाम दिसू लागतो. मानसिक व शारीरिक तंदुरुस्ती कामकाज सुद्धा प्रभावीपणे व अचूकपणे पुढे चालवत राहते. यातून सकारात्मक भावना वाढीस लागून सांघिक पणे काम करण्याची विचारसरणी सुद्धा विकसित होते. विशिष्ट वयानंतर खेळाकडे दुर्लक्ष होऊन नाविन्याचा शोध घेण्यासाठी सुद्धा फारसे कोणी लक्ष देत नाही. सोशल मीडियाच्या जमान्यात खेळ हा प्रकार इतिहास जमा होत चालला आहे. प्रत्येक व्यक्तीने शालेय जीवनामध्ये विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग नोंदवला. त्याची उजळणी सुद्धा या निमित्ताने होऊन जुन्या आठवणींमध्ये खेळाडू स्वतःला हरवून गेले. ग्रामीण भागामध्ये प्रदूषण विरहित हवामान आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना फारशा समस्यांना तोंड द्यावे लागत नाही, मात्र शहरी भागामध्ये सर्वच प्रकारचे प्रदूषण असल्याने काम करण्याच्या शारीरिक क्षमतेवर सुद्धा परिणाम होऊन भावनिक तणाव सुद्धा लवकर वाढतो. या सर्वांवर जालीम उपाय म्हणून खेळांमधील सर्वांचाच सहभाग वाढणे आवश्यक आहे, असे कराड म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड, सूत्रसंचालन सचिन शिरसाट तर आभार रवी डाळिंबकर यांनी मानले .
22685
10




