पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयाला लसीचा पुरवठा जास्त मिळावा यासाठी महसूलमंञी बाळासाहेब थोरात यांना निवेदन
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 24 एप्रिल 2021
पाथर्डी तालुक्यामध्ये लसीकरण अत्यंत कमी गतीने चालू आहे त्यामुळे तालुक्याला लसींनचा पुरवठा जास्तीत जास्त करावा व पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयाला रेमडिसिव्हीयर, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर व औषध सामुग्रीचा जास्त पुरवठा अहमदनगर
येथून करावा. या मागण्यांसाठी अँड.प्रतापकाका ढाकणे यांच्या वतीने
नामदार बाळासाहेब थोरात(महसूलमंत्री) यांना पाथर्डी येथे झालेल्या आढावा बैठक प्रसंगी निवेदन देण्यात आले.यावेळी मा.जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर दादा राजळे,नगरसेवक बंडूपाटील बोरुडे,जिल्हा उपाध्यक्ष रा.कॉ.पार्टी सीताराम बापू बोरुडे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत मरकड,शहरध्यक्ष योगेश रासणे,युवा नेते देवा पवार, शुभम वाघमारे आकाश शिंदे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.