प्रवरा माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी बनला वर्ग एक वनाधिकारी
पाथर्डी प्रतिनिधी:
तालुक्यातील भुते टाकळी येथील आणि प्रवरा माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी प्रमोद राजेंद्र फुंदेची वर्ग एक वनाधीकारी पदी निवड झाली आहे.
भुतेटाकळी येथील प्रवरा माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी प्रमोद फुंदे हा मार्च २०११ च्या बॅचचा विद्यार्थी आहे. त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा २०२४ मध्ये ५९ वी रँक प्राप्त करून वर्ग एक वन अधिकारी बनला आहे. याप्रसंगी त्याचा सन्मान विद्यालयाच्या वतीने करण्यात आला. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री असिफ पठाण यांच्या हस्ते त्याचा सन्मान शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला आणि त्यास भरभरून शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी भुते टाकळी येथील गावकरी आणि विद्यालयातील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
फुंदे याच्या या यशाबद्दल सर्व स्तरांमधून त्यांचे अभिनंदन होत आहे.