breaking news- १३ विद्यापीठांच्या परिक्षा 'ऑनलाइन'च!
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 22 एप्रिल 2021
राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसतोय. राज्यात लॉकडाउनही लावण्यात आला असून त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. अशा परिस्थितीत नियोजित वेळापत्रकानुसार जर विद्यार्थ्यांना परिक्षा देण्यासाठी परिक्षा केंद्रावर जावं लागणार असेल तर त्यांना लॉकडाउनच्या निकषांतून सूट द्यावी लागेल. या साऱ्या परिस्थितीचा विचार करून अखेर आज महाराष्ट्रातील १३ अकृषी विद्यापीठांच्या उर्वरित सर्व परिक्षा या ऑनलाइन पद्धतीनेच घेतल्या जातील अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. विद्यापीठांना आवश्यक त्या सोयी सुविधा राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडून पुरवल्या जातील पण कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि कोणताही विद्यार्थी परिक्षेपासून वंचित राहू नये, याची जबाबादारी विद्यापीठांच्या कुलगुरूंची असेल.
या सर्व विद्यापीठांना दोन दिवसात या संबंधीच्या आदेशाचे पत्रक मिळेल, असंही सामंत यांनी स्पष्ट केलं.