कवडदरा विद्यालयात आदिवासी दिन व क्रांती दिनामिम्मित क्रांतीकारकांना अभिवादन
कवडदरा-
इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील भारत सर्व सेवा संघ शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर काॕलेज कवडदरा विद्यालयात आदिवासी दिन व क्रांती दिनानिम्मित विद्यार्थ्यांची गावातुन प्रभात फेरी काढण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी घोषणा देत क्रांती कारकांचा जय जय असा 'नारा' देत गर्जना दिली.यावेळी गावातील गणेश रोंगटे तसेच 'रावण' गृप मिञ मंडळ यांच्या वतीने कार्यक्रम झाला यावेळी आद्य क्रांतीकारक यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.यावेळी आदिवासी क्रांती कारक यांची आरती पुजा करण्यात आली.
यांनतर गावातून बैलगाडी सजवून त्यामध्ये क्रांतीकारकांच्या वेशभूषा केलेल्या व्यक्तींनी बैलगाडीत बसुन गावातून मिरवणूक मध्ये डोल-ताश्याच्या गजरात गाव फेरी केली.
यानंतर विद्यालयात आदिवासी दिन क्रांती दिनानिम्मित क्रांतीकारकांच्या प्रतिमेचे पुजन कार्यक्रमासाठी आलेले मान्यवर श्री.किसनदादा रोंगटे, भोईर बाबा,
श्री.हनुमंता निसरड, पोलिस पाटील प्रकाश रोंगटे, संपत भाऊ रोंगटे
गणेश रोंगटे,विषाल भोईर विद्यालयाचे मुख्याध्यापक/प्राचार्य बी.एस.पवार,माजी विद्यार्थी,तसेच इतर मान्यवर यांच्या हस्ते झाले.यावेळी प्राथमिक जि.प. शाळा कवडदराचे विद्यार्थ्यांना आद्य क्रांती कारक बिरसा मुंडा, आ.क्रांती. राघोजी भांगरे तसेच इतर क्रांती कारक यांची आरती म्हणत गायन केले.
यानंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगतातून आदिवासी दिन व क्रांती दिनाचे महत्त्व सांगितले.यावेळी विद्यार्थ्यांनी अतिशय चांगली भाषणे केली. ग्रामस्थ माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.