महाराष्ट्र
11441
10
शस्त्राचा धाक; तब्बल ५७ तोळे सोने लुटले
By Admin
शेतवस्तीवर शस्त्राचा धाक; तब्बल ५७ तोळे सोने लुटले
शेवगाव तालुक्यात नागलवाडीतील घटना; दीड लाखाची रोकडही पळविली
नगर सिटी न्यूज 24 live नेटवर्क
बोधेगाव (जि. अहिल्यानगर) : नागलवाडी
(ता. शेवगाव) येथील गिते वस्तीवरील सेवानिवृत्त मुख्याध्यापकाच्या मानेला तलवार लावून सशस्त्र चोरट्यांनी ५७ तोळे सोन्याचे दागिने व दीड लाखाची रोकड लंपास केली. चोरट्यांनी घरातील सीसीटीव्ही संचही सोबत नेला. शुक्रवारी (दि. १३) रात्री ही घटना घडली. याबाबत सेवानिवृत्त मुख्याध्यापक राम मारुती गिते यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीक्षेत्र भगवानगडाच्या पायथ्याशी नागलवाडी गाव आहे. तेथील गिते वस्तीवर सेवानिवृत्त मुख्याध्यापक राम मारुती गिते (वय ६६) हे पत्नी छाया गिते (वय ५६) यांच्यासह राहतात. त्यांची दोन मुले कामानिमित्त बाहेरगावी असतात. शुक्रवारी रात्री जेवणानंतर गिते पती-पत्नी झोपी गेले. रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास चोरट्यांनी घरामागील मोसंबी बागेचे तारेचे कुंपण तोडून अंगणात प्रवेश केला. नंतर किचनचे लोखंडी गेट तोडून त्यांनी घरात प्रवेश केला. किचनच्या दरवाजाचा आवाज आल्याने गिते दाम्पत्य जागे झाले. त्यावेळी एकाने राम गिते यांच्या मानेला तलवार लावत दाम्पत्यास 'चूप
चोरट्यांनी कपाटातील वस्तूंची अशी नासधूस केली.
बैठो' असे म्हणत खाली बसण्यास सांगितले. दोघांचेही मोबाइल त्यांनी फोडले. दोन जणांनी कपाटाची उचकापाचक करून त्यातील सोन्याच्या अंगठ्या, बांगड्या, मिनी गंठण, मंगळसूत्र, कानातील झुंबर, साखळ्या असे तब्बल ५७ तोळे सोन्याचे दागिने व दीड लाखाची रोकड असा अंदाजे ८० लाखांचा ऐवज लुटला. राम गिते यांच्या हातातील सोन्याची अंगठी व पत्नीच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून चोरट्यांनी
वायफाय केबल तोडून डीव्हीआर पळविला
चोरट्यांनी आत प्रवेश करण्याआधी घरावरील वायफाय व सीसीटीव्ही केबल तोडून कॅमेरे बंद पाडले. दोन्ही दाम्पत्याचे मोबाईलही फोडले. घरातील ऐवज नेताना सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआरही सोबत नेला. हिंदी व वेगळ्या भाषेतून ते बोलत असल्याचे फिर्यादी राम गिते यांनी सांगितले.
तेथून पोबारा केला. त्यानंतर राम गिते यांनी आरडाओरड करून शेजाऱ्यांना बोलावले. शेजारच्या फोनवरून ११२ क्रमांकावर संपर्क साधून त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर काही वेळातच पोलिस घटनास्थळी दाखल झाले; मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली.
Tags :
11441
10




